Join us

"बॉलिवूडमधील अभिनेत्यांना हिंदीही वाचता येत नाही", जावेद अख्तर स्पष्टच बोलले, म्हणाले- त्यांच्यासाठी आम्हाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 11:30 AM

जावेद अख्तर यांनी बॉलिवूडमधील नवोदित कलाकारांबद्दल रोखठोक मत मांडलं आहे. 

बॉलिवूडमधील दिग्गज लेखक जावेद अख्तर अगदी स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडताना दिसतात. एखाद्या विषयावर ते परखडपणे त्यांचं मत मांडताना दिसतात. बॉलिवूड आणि कलाकारांबाबतही अनेकदा जावेद अख्तर यांनी केलेली विधानं चर्चेत आली आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' सिनेमाबाबत वक्तव्य केलं होतं. आता त्यांनी बॉलिवूडमधील नवोदित कलाकारांबद्दल रोखठोक मत मांडलं आहे. 

जावेद अख्तर यांनी नुकतीच 'हिंदी आणि उर्दू : सियामीज ट्विन्स' या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी ते म्हणाले, "फिल्म इंडस्ट्रीमधील नवख्या कलाकारांसाठी आम्ही रोमनमध्ये(इंग्रजी स्क्रिप्ट) स्क्रिप्ट लिहितो. त्यांना त्याच्याव्यतिरिक्त काहीही वाचता येत नाही. कोणत्याही भाषेचा कोणत्या धर्माबरोबर संबंध नसतो. हिंदू आणि उर्दू वेगवेगळ्या भाषा आहेत, २०० वर्षांपूर्वीच हे अधिकाऱ्यांनी स्वीकार केलं आहे. पण, त्या एकच भाषा आहेत. पाकिस्तानमधील बंगाली काही वर्षांपूर्वी आमचा जीव गेला तरी उर्दू शिकणार नाही. आम्हाला आणखी एक देश (बांगलादेश) हवा आहे. हे १० कोटी लोक कोण होते? ते उर्दू बोलायचे का?" 

"उर्दू ही केवळ भारतीय उपमहाद्वीपमध्ये बोलली जाणारी भाषा आहे. याचा धर्माशी काहीही संबंध नाही. तुम्ही तमिळनाडूमधील लोकांना सांगा की हिंदी हिंदूंची भाषा आहे. मग बघा काय होतं. तुम्ही हिंदी शब्दांचा वापर केल्याशिवाय उर्दूमध्ये कोणतंही वाक्य लिहू शकत नाही. ९० टक्के शब्दसंग्रह सारखाच आहे. आपल्यातील दिग्गज लेखक आणि विद्वानांनी विस्मरत चाललेल्या आपल्या भाषांचा शब्दसंग्रह तयार केला पाहिजे. विचार करा आपला शब्दसंग्रह किती छान होईल.  मी भारतीयांसाठी लिहितो. मी उर्दू किंवा हिंदी भाषिकांसाठी लिहित नाही. ज्या दिवशी भारतीयांमध्ये याबाबत रुची निर्माण होईल, तेव्हा भाषा आपोआप ठीक होईल," असंही ते पुढे म्हणाले. 

टॅग्स :जावेद अख्तरसेलिब्रिटीसिनेमा