Join us

"५३ वर्षांच्या कारकीर्दीत आजवर..."; 'अ‍ॅनिमल' दिग्दर्शक संदीपला जावेद अख्तर यांचं सणसणीत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 13:03 IST

'अ‍ॅनिमल' दिग्दर्शक संदीपला जावेद अख्तर यांचं सणसणीत उत्तर! फरहान अख्तरवरील टिकेचा घेतला समाचार

 गेल्या अनेक दिवसांपासून जावेद अख्तर आणि 'अ‍ॅनिमल' दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. काही दिवसांपुर्वी संदीप यांनी जावेद अख्तर यांचा लेक फरहान अख्तरच्या 'मिर्झापूर' वेबसिरीजमधील हिंसाचारावर बोट ठेऊन जावेद यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं. आता संदीप यांनी फरहान केलेल्या टिकेचा जावेद यांनी खरपूस समाचार घेतला. काय म्हणाले जावेद? 

जावेद अख्तर म्हणाले, "जेव्हा त्यांनी मला उत्तर दिलं, तेव्हा माझ्यासाठी तो सन्मान होता. माझ्या ५३ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना माझा एकही चित्रपट, एकही स्क्रिप्ट, एकही सीन, एकही संवाद, एकही गाणं टिका करायला मिळालं नाही. त्यामुळे त्यांना माझ्या मुलाची एक टीव्ही मालिका शोधावी लागली. ज्यामध्ये फरहानने ना अभिनय केलाय, ना दिग्दर्शन केलंय, ना लिहिलंय."

जावेद पुढे म्हणाले, "फक्त फरहानच्या कंपनीने त्याची निर्मिती केली आहे. आजकाल, एक्सेल सारखी मोठी कंपनी अनेक गोष्टी तयार करत आहे. आणि त्यापैकी ही एक आहे. 53 वर्षांच्या कारकिर्दीत तो माझ्यातील काहीही चूक बाहेर काढू शकला नाही ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे? मला 'ॲनिमल' चित्रपटाबाबत कोणतीही अडचण नाही पण तो प्रेक्षकांमध्ये किती लोकप्रिय आहे याची काळजी वाटते." असं सणसणीत उत्तर जावेद यांनी दिलंय.

 

टॅग्स :जावेद अख्तरफरहान अख्तर