Join us

जावेद जाफरीची पहिली पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 8:00 PM

जावेद जाफरी हा प्रसिद्ध कॉमेडियन जगदीप यांचा मुलगा असून त्याचे दुसरे लग्न हबिबा जाफरीसोबत झालेले आहे.

ठळक मुद्देजेबा आणि जावेद यांनी लपूनछपून लग्न केले होते. पण काहीच महिन्यांमध्ये ते दोघे वेगळे झाले. जेबा आणि जावेदचे लग्न झाले असले तरी तिने मीडियात या गोष्टीला नकार दिला होता. पण जावेदने ‘निकाहनामा’ दाखवल्यावर खरे ते सगळे जगासमोर आले होते. 

जावेद जाफरीचा मुलगा मीजान जाफरीने मलाल या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये नुकतीच एंट्री केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मंगेश हाडवळे यांनी केले असून हा एक रोमाँटिक सिनेमा आहे. या चित्रपटात त्याची जोडी शर्मिन सहगल सोबत जमली असून मीजानची या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना आवडत आहे. मीजानच्या वडिलांनी म्हणजेच जावेद जाफरीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून तो त्याच्या अभिनयाइतकाच त्याच्या नृत्यासाठी ओळखला जातो. त्याच्या डान्सिंगची नेहमीच तारीफ केली जाते. 

जावेद जाफरी हा प्रसिद्ध कॉमेडियन जगदीप यांचा मुलगा असून त्याचे लग्न हबिबा जाफरीसोबत झालेले असून त्यांना मीजान , अब्बास आणि अल्विरा अशी तीन मुले आहेत. जावेद जाफरीचे हबिबासोबतचे लग्न हे दुसरे असून त्याचे पहिले लग्न एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झाले होते. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून हिना या प्रसिद्ध चित्रपटात झळकलेली जेबा बख्तियार आहे. हिना या चित्रपटात जेबाने ‘हिना’ नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. ‘मैं हू खुशरंग हिना’ हे या चित्रपटाचे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते. जेबा आणि जावेद यांनी लपूनछपून लग्न केले होते. पण काहीच महिन्यांमध्ये ते दोघे वेगळे झाले. जेबा आणि जावेदचे लग्न झाले असले तरी तिने मीडियात या गोष्टीला नकार दिला होता. पण जावेदने ‘निकाहनामा’ दाखवल्यावर खरे ते सगळे जगासमोर आले होते. 

जेबाचे लग्न प्रसिद्ध गायक अदनान सामीसोबत देखील झाले होते. अदनान आणि जेबा यांना एक मुलगा झाला. त्यांचे लग्न केवळ दोन वर्षे टिकले. १९९७ मध्ये ते दोघे विभक्त झाले. तिचे पहिले लग्न सलमान वालियानीसोबत झाले होते. त्यांना एक मुलगीही झाली. पण हे देखील लग्न फार काळ टिकले नाही. बॉलिवूडमध्ये करियर संपल्यानंतर जेबा पाकिस्तानला परतली. तिथे तिने सोहेल खान लेगारीसोबत लग्न केले. जेबाने एक नाही, दोन नाही तर तब्बल चार लग्न केलीत.

टॅग्स :जावेद जाफरी