Join us

'जवान' ऑस्करसाठी पाठवण्याची दिग्दर्शकाची इच्छा, म्हणाला, 'शाहरुखशी यावर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 2:23 PM

'जवान'ला ऑस्करसाठी पाठवायची इच्छा असल्याचं अॅटलीने सांगितलं.

साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली कुमारने (Atlee Kumar) आतापर्यंत ९ चित्रपट केले आणि ते सगळेच सुपरहिट झाले. शाहरुखसोबत (Shahrukh Khan) नुकताच रिलीज झालेला 'जवान' तर सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. सिनेमाने जगभरात ८०० कोटींची कमाई केली आहे. तर भारतात ११ दिवसातच ५०० कोटींचा गल्ला जमवला आहे. दरम्यान 'जवान'ला ऑस्करसाठी पाठवायची इच्छा असल्याचं अॅटलीने सांगितलं.

'जवान' हा सिनेमा सिस्टीमला धडा शिकवणारा आहे. तसंच मतदारांना त्यांचं कर्तव्य पार पाडायला आणि मत देताना विचार करायला शिकवणारा सिनेमा आहे. सिनेमाची स्टोरी खूपच इंटरेस्टिंग असून यात साऊथ स्टाईल अॅक्शन आहे. शाहरुखने यामध्ये डबल रोल केला आहे. तर त्याच्यासोबत मोठी गर्लगँग दिसत आहे. अॅटली 'जवान'चा सिक्वल बनवण्याचाही विचार करत आहे. यासाठी तो चांगल्या स्क्रीप्टच्या शोधात आहे. तर सोबतच त्याच्या डोक्यात 'जवान' ऑस्करसाठी पाठवण्याचाही मानस आहे. 

'जवान' ऑस्करपर्यंत मजल मारणार? अॅटली म्हणाला...

सिनेमाला ग्लोबल बनवण्याची गोष्ट होत असताना तुझी नजर ऑस्करवर आहे का असं अॅटलीला विचारलं असता तो म्हणाला,'नक्कीच, जर सगळं ठीक झालं तर जवानही ऑस्करला गेला पाहिजे. मला वाटतं सिनेमात काम करणाऱ्या प्रत्येक दिग्दर्शक, टेक्निशियनची नजर गोल्डन ग्लोब, ऑस्कर, राष्ट्रीय पुरस्कारांवर असते. तर निश्चितच मी जवानला ऑस्करसाठी पाठवू इच्छितो. बघुया काय होतं. मला वाटतं खान सर ही मुलाखत बघतील. मी त्यांना फोन करुन विचारेन की आपल्याला या सिनेमाला ऑस्करसाठी पाठवलं पाहिजे का?'

शाहरुख खान आणि अॅटली कुमारने पहिल्यांदाच एकत्र काम केलं आहे. २०२० मध्ये शाहरुखकडे जवानची स्क्रीप्ट आली होती. तेव्हा त्याला ती खूपच आवडली. तेव्हापासूनच शाहरुख आणि अॅटली यावर काम करत होते. 

 

टॅग्स :जवान चित्रपटशाहरुख खानऑस्कर