Join us

“मी भारावून गेलो आहे”, ‘जवान’ला मिळणारा प्रतिसाद पाहून शाहरुखही थक्क, चाहत्यांसाठी केलं खास ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 16:24 IST

Jawan : 'जवान' चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून शाहरुख खान भारावून गेला आहे. खास ट्वीट करत त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित किंग खानचा ‘जवान’ हा चित्रपट अखेर आज प्रदर्शित झाला. टीझरपासूनच शाहरुख खानच्या या चित्रपटासाठी प्रेक्षक आतुर होते. या चित्रपटातील शाहरुखचे वेगवेगळे लूक पाहून चाहतेही थक्क झाले होते. जवान चित्रपटाच्या अडव्हान्स बुकिंगला शाहरुखच्या चाहत्यांनी दमदार प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला. त्यानंतर आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही थिएटर हाऊसफूल होत आहेत. ‘जवान’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानचे थिएटरमधील अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. जिकडेतिकडे शाहरुखच्या चाहत्यांची क्रेझ पाहायला मिळत आहे.

‘जवान’ला मिळणारा प्रतिसाद पाहून शाहरुखही भारावून गेला आहे. ‘जवान’ची क्रेझ आणि चाहत्यांचं प्रेम पाहून किंग खान थक्क झाला आहे. त्याने ट्वीट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. “वॉव...चित्रपट पाहण्यासाठी थिएटरपर्यंत गेलेल्या प्रत्येक फॅन क्लब आणि प्रेक्षकाचे आभार मानण्यासाठी वेळ काढावी लागली. मी भारावून गेलो आहे. मी एक-दोन दिवसात भानावर आल्यावर नक्कीच काहीतरी करेन. उफ! तुम्हाला खूप सारं प्रेम. #Jawan” असं शाहरुखने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या ट्वीटवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

“दिग्दर्शकाला भेटायला गेले तेव्हा...”, गिरीजा ओकने सांगितला ‘जवान’चा अनुभव, म्हणाली, “मी दोन वर्ष...”

शाहरुख खानने ‘जवान’ चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट सुपरहिट सिनेमांचे रेकॉर्ड मोडणार आहे. ‘जवान’ प्रदर्शनाच्या दिवशी जवळपास देशात ७५ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई करेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहेत. तर जगभरात हा चित्रपट पहिल्याच दिवशी १०० कोटींचा गल्ला जमवण्याची शक्यता आहे.

शाहरुखचा जबरा फॅन! 'जवान' प्रदर्शित झाल्यानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने केलं टक्कल, Video पाहा

दरम्यान, अटली कुमार दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटात शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपथी यांच्या मुख्य भूमिका आहेत. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने या चित्रपटात पाहुणी कलाकाराची भूमिका साकारली आहे. तर मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक ‘जवान’मध्ये झळकली आहे.

टॅग्स :शाहरुख खानजवान चित्रपटसेलिब्रिटी