Join us

Jawan: शाहरुख खानच्या 'जवान'मधील नयनताराचा फर्स्ट लूक लीक? सोशल मीडियावर होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 13:01 IST

अभिनेत्री नयनताराचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'जवान' चित्रपटातील त्याचा हा फर्स्ट लूक असल्याचे सांगण्यात येत आहे.

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार, किंग खानच्या जवान या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान, अभिनेत्री नयनताराचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'जवान' चित्रपटातील त्याचा हा फर्स्ट लूक असल्याचे सांगण्यात येत आहे. हा फोटो समोर आल्यापासून इंटरनेटवर जोरदार व्हायरल होतोय.

साऊथ अभिनेत्री नयनताराचा हा व्हायरल फोटो त्याच्या ट्विटरवर एका फॅन पेजने शेअर केला आहे. हे पाहिल्यानंतर लोक दावा करत आहेत की, नयनताराचा लूक 'जवान'मधील आहे. या फोटोमध्ये नयनताराने गुलाबी रंगाचा ब्लेझर आणि लाल रंगाचा शर्ट घातला आहे. मात्र, अद्याप यावर निर्मात्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता हा फोटो खरोखरच 'जवान'चा लीक झाला आहे की नाही, हे जवानचा ट्रेलर आल्यानंतरच कळेल. 

साऊथ अभिनेत्री नयनतारा शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शाहरुख आणि नयनतारा व्यतिरिक्त या चित्रपटात रिद्धी डोगरा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी आणि सुनील ग्रोव्हर सारखे स्टार्स दिसणार आहेत. दिपिका पादुकोणचा ही यात कॅमिओ आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर हा चित्रपट ७ सप्टेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. याआधी शाहरुख खान दीपिका पादुकोणसोबत पठाणमध्ये दिसला होता अशी माहिती आहे. शाहरुखच्या 'पठाण' प्रमाणेच जवानही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

टॅग्स :शाहरुख खाननयनतारा