Join us

पुण्याच्या मेट्रो स्टेशनवर झालं आहे शाहरुखच्या 'जवान'चं शूटिंग, तुम्हाला माहितीये का किस्सा?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 12:50 PM

Jawan : ‘जवान’चं पुण्याशी खास कनेक्शन आहे. 'जवान'मधील काही भागाचं शूटिंग पुण्यात झालं आहे.

शाहरुख खानच्या ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेला जवान ७ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. तगडी स्टार कास्ट आणि उत्तम कथा असलेला ‘जवान’ प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरा उतरल्याचं चित्र आहे. ‘जवान’चे चित्रपटगृहांतील शो हाउसफूल होत आहेत. चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या ‘जवान’चं पुण्याशी खास कनेक्शन आहे. 'जवान'मधील काही भागाचं शूटिंग पुण्यात झालं आहे.

‘जवान’मध्ये शाहरुख खान, दीपिका पदुकोण, नयनतारा, विजय सेतुपथीबरोबर मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकही या चित्रपटात झळकली आहे. गिरीजाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘जवान’च्या शूटिंगचे किस्से आणि सुपरस्टार्सबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. यावेळी तिने जवानच्या पुण्यातील शूटिंगबद्दलही भाष्य केलं. ‘जवान’ चित्रपटाच्या सुरुवातीलाच मेट्रोमधील सीन दाखविण्यात आला आहे. शाहरुख खान आणि सहा महिला मेट्रो हायजॅक करतात. हे शूटिंग पुणे मेट्रो स्टेशनवर करण्यात आलं आहे.

“दिग्दर्शकाला भेटायला गेले तेव्हा...”, गिरीजा ओकने सांगितला ‘जवान’चा अनुभव, म्हणाली, “मी दोन वर्ष...”

‘जवान’ चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी पुणे मेट्रो स्टेशनवर हे शूटिंग करण्यात आलं. गिरीजाने या शूटिंगचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “पुण्याच्या मेट्रो स्टेशनवर आमचं पहिल्या दिवसाचं शूटिंग झालं. खूप मोठा तामझाम होता. खूप ज्युनिअर्स, सिक्युरिटी, गर्दी पाहून पहिल्याच दिवशी कोणत्या लेव्हलच्या चित्रपटात आपण काम करतोय, याचा अनुभव आला.”

अभिनयातील ब्रेकनंतर समांथा राजकारणात एन्ट्री घेणार? ‘या’ पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा

‘थेरी’, ‘राजा रानी’, ‘बिगील’ यांसारखे सुपरहिट चित्रपटांनंतर अ‍ॅटली कुमार ‘जवान’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. अ‍ॅटली कुमार दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगलाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधूनच या चित्रपटाने कोटींची कमाई केली होती. पहिल्याच दिवशी ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला. ‘जवान’ने हिंदी व्हर्जनमध्ये ६५ कोटींची कमाई केली आहे. तर सर्व भाषांमध्ये एकूण ७५ कोटींचा गल्ला जमवला. बॉक्स ऑफिसवर हिंदीत सर्वाधिक कमाई करणारा ‘जवान’ पहिला चित्रपट ठरला आहे.

टॅग्स :जवान चित्रपटशाहरुख खाननयनतारागिरिजा ओकदीपिका पादुकोणसंजय दत्त