Join us

टीव्ही अभिनेत्रीने साकारली शाहरुखच्या आईची भूमिका, नेटकरी म्हणाले, 'इतकी सुंदर...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 13:20 IST

३८ वर्षीय अभिनेत्रीने ५७ वर्षांच्या शाहरुखच्या आईची भूमिका साकारली आहे.

'जवान'चा (Jawan) ट्रेलर सध्या चांगलाच धुमाकूळ घालतोय. ज्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो अखेर काल प्रदर्शित झाला. यामध्ये शाहरुख दुहेरी भूमिकेत असून त्याचे वेगवेगळे लुक दिसत आहेत. तसंच साऊथ कलाकारांची मांदियाळी आहे. ट्रेलरमध्ये एका टीव्ही अभिनेत्रीने लक्ष वेधून घेतलंय. कारण तिने चक्क शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) आईची भूमिका साकारली आहे. कोण आहे ती अभिनेत्री?

३०० कोटींमध्ये बनलेल्या 'जवान' सिनेमाचं दिग्दर्शन अॅटली कुमारने केलं आगे. अॅटली साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. विजय सेतुपति, नयनतारा, प्रियमणि, योगी बाबू, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा, गिरीजा ओक यांची मुख्य भूमिका आहे. ट्रेलरमधील एका सीनमध्ये 38 वर्षीय रिद्धी डोगरा (Riddhi Dogra) शाहरुखच्या आईच्या भूमिकेत दिसत आहे. 

रिद्धी डोगरा प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. जवानच्या ट्रेलरमध्ये तिने वृद्ध महिलेचा लुक दिसून येतोय. 57 वर्षांच्या अभिनेत्याच्या आईच्या भूमिकेत 38 वर्षांची अभिनेत्री दिसत आहे. यावर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. 'इतकी सुंदर आई कधी बघितली नाही','हद्द झाली यार, तू आईची भूमिका करत आहेस हे खूपच दु:खद आहे','हद्द आहे इतक्या सुंदर अभिनेत्रीला आईचा रोल दिला' अशा कमेंट्स यावर आल्या आहेत.

याआधीही आमिर खानच्या 'लाल सिंह चड्डा' सिनेमात अभिनेत्री मोना सिंहने आमिर खानच्या आईची भूमिका साकारली होती. मोना ४१ वर्षांची असून आमिर खान 58 वर्षांचा आहे. दोघांमध्ये 17 वर्षांचं अंतर आहे. तर आता शाहरुख आणि रिद्धी डोगरामध्ये 19 वर्षांचं अंतर आहे.

टॅग्स :रिद्धी डोगराशाहरुख खानजवान चित्रपटटिव्ही कलाकार