Join us

जावेद अख्तर यांनी घेतली सोनू निगमची बाजू; म्हटले, ‘धार्मिक स्थळांवर लाउडस्पीकरचा वापर नको’!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 1:22 PM

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी गायक सोनू निगमची बाजू घेताना त्याच्या वक्तव्यांचे समर्थन केले आहे. साधारणत: वर्षभरापूर्वी सोनूने मशिदीत ...

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी गायक सोनू निगमची बाजू घेताना त्याच्या वक्तव्यांचे समर्थन केले आहे. साधारणत: वर्षभरापूर्वी सोनूने मशिदीत होणाºया अजानविषयी एक ट्विट केले होते. ज्यामुळे सोनू चांगलाच वादात सापडला होता. सोनूच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. मात्र सोनू त्याच्या वक्तव्यावर ठाम राहिला. यासाठी त्याने स्वत:चे मुंडणही करून घेतले होते. त्यानंतर काहीसा हा वाद शमत असताना दिसत होते. परंतु आता पुन्हा एकदा हा वाद उफाळून आल्याचे दिसत आहे. वास्तविक गेल्या काही दिवसांपासून धार्मिक स्थळांवर होणारा लाउडस्पीकरचा वापर यावर सध्या सर्वत्र चर्चा रंगत आहे. सोशल मीडियावर त्याचे पडसाद उमटताना दिसत असल्याने दोन गट आमने-सामने उभे असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशात ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी एक ट्विट केले असून, ज्यामध्ये ते सोनू निगमचे समर्थन करताना दिसत आहेत. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘केवळ मशिदीवरच नव्हे तर रहिवासी परिसरात असलेल्या कोणत्याही धार्मिक स्थळांवर लाउडस्पीकरचा वापर केला जाऊ नये.’ यावेळी त्यांनी ट्विटरवर त्यांना पाखंडी म्हणणाºयासही रोखठोक उत्तर दिले. जावेद अख्तर यांनी एका युजर्सला उत्तर देताना लिहिले की, ‘मी प्रत्येक चुकीच्या गोष्टीविरोधात आवाज उठवित असतो. अडचण हीच आहे की, आपण दुसºयांच्या चुका मान्य करतो, परंतु आपली चूक कधीच मान्य करीत नाही.’ जावेद अख्तर यांच्या या ट्विटनंतर सोनू निगमनेही समाधान व्यक्त केले. एका चॅनलशी बोलताना सोनूने म्हटले की, ‘जावेदजी यांनी योग्य वेळी आपले मत मांडले. कदाचित त्यांना याची जाणीव झाली असेल की, गेल्या दोन दिवसांपासून अशी अफवा पसरविली जात आहे की, माझ्या जिवाला धोका आहे. तसेच चित्रपटसृष्टीतील बरेचसे लोक माझ्या समर्थनार्थ पुढे येऊ इच्छित नाहीत. यावेळी सोनू निगमने हीदेखील खंत व्यक्त केली की, ‘पद्मावत’च्या समर्थनार्थ चित्रपटसृष्टीतील लोक संजय लीला भन्साळी यांच्या खाद्यांला खांद्या देऊन समर्थन करताना दिसले. परंतु माझ्या समर्थनार्थ कोणीही पुढे आले नाही.