jaya bachchan birthday special : बॉलिवूडच्या आयकॉनिक चित्रपटांच्या यादीत एका चित्रपटाचा उल्लेख करावाच लागेल. तो म्हणजे ‘सिलसिला’. ‘सिलसिला’ (Silsila)हा चित्रपट आजही त्याच्या स्टारकास्टसाठी आठवला जातो. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan),जया बच्चन (Jaya Bachchan) आणि सोबत रेखा (Rekha). ‘सिलसिला’ या चित्रपटाचं हे त्रिकुट एकत्र काम करणार म्हटल्यावर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं. जया बच्चन या चित्रपटासाठी राजी झाल्याच कशा? हा एक प्रश्न तर सर्वांनाच पडला होता. 70 च्या दशकात अमिताभ व रेखा यांच्या अफेअरच्या चर्चेने जया यांना चिंतेत टाकलं होतं. काहीअर्थी हीच कथा ‘सिलसिला’च्या रूपात दाखवली जाणार होती. साहजिकच या चित्रपटासाठी रेखा, जया व अमिताभ यांना राजी करणं दिग्दर्शक यश चोप्रांसाठी एवढं सोप काम नव्हतं. मनातून तेही घाबरले होते.
खरं तर या चित्रपटासाठी स्मिता पाटील, परवीन बॉबी व अमिताभ बच्चन यांना घेण्याचा विचार सर्वप्रथम यश चोप्रा यांनी केला होता. पण मनातून त्यांना ही स्टारकास्ट आवडली नव्हती. कारण त्यांच्या डोक्यात रेखा आणि जया होती.
एकदिवस घाबरत घाबरत यश यांनी अमिताभ यांच्याकडे या दोघींबद्दलचा विषय छेडालाच. मला या चित्रपटात जया व रेखाला घ्यायची इच्छा आहे, असं यश चोप्रा म्हणाले. यावर अमिताभ यांनी एक भला मोठा पॉझ घेतला आणि जया व रेखा तयार असतील तर मला अडचण नाही..., असं ते शांतपणे म्हणाले. जया व रेखा यांना राजी करणं वाटतं तितकं सोप नाही, हे अमिताभ जाणून होते. कारण दोघींची अवस्था त्यांना ठाऊक होती.
जया नव्हत्या राजी...यश चोप्रा यांनी जया बच्चनसोबत चर्चा केली. सुरूवातीला जया यांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. पण यश चोप्रांनी हार मानली नाही. अखेर जया एका अटीवर ‘सिलसिला’मध्ये काम करण्यास राजी झाल्या. होय, चित्रपटाची हॅपी एंडिंग होणार असेल तरच मी या चित्रपटात काम करेल, असं जया यांनी स्पष्ट सांगितलं. सरतेशेवटी अमिताभला जयाजवळच परतावं लागेल, हीच त्यांची अट होती. यश चोप्रा यांनी जया यांची ही अट मान्य केली आणि जयांनी ‘सिलसिला’ साईन केला.