बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) त्यांची नात नव्या नवेली नंदा(Navya Naveli Nanda) हिच्या खूप जवळ आहे. सध्या त्या चित्रपट जगतापासून दूर असेल्या, तरीही त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. या सगळ्यामध्ये आता जया बच्चन यांनी आपल्या नातीला रिलेशनशिपबाबत काही सल्ला दिला आहे ज्याची खूप चर्चा होत आहे.
अलिकडेच जया बच्चन आणि त्यांची मुलगी श्वेता बच्चन यांनी नव्याच्या पॉडकास्ट 'व्हॉट द हेल नव्या'वर भाग घेतला होता. येथे बोलत असताना जया बच्चन यांनी त्यांची नात नव्या नवेली नंदा हिला बोल्ड रिलेशनशिपचा सल्ला दिला. जया बच्चन म्हणाल्या, 'कोणतेही नाते दीर्घकाळ टिकण्यासाठी शारीरिक आकर्षण खूप महत्त्वाचे असते. आम्ही आमच्या काळात प्रयोग करू शकलो नाही. इतकंच नाही तर जया बच्चन यांनी तर नव्या लग्नाशिवाय आई झाली तर तिला कोणतीही अडचण येणार नाही असंही म्हटलं आहे.
जया म्हणाल्या, 'कोणतेही नातं केवळ प्रेम, अॅडजस्टमेंटवर चालत नाही. माझ्या या सर्व बोलण्यावर अनेकांचा आक्षेप असेल, पण शारीरिक आकर्षण आणि अनुकूलता या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आमच्या काळात प्रयोग करता येत नव्हते पण आजची पिढी करते आणि का करु नये? जर शारीरिक संबंध नसतील तर कोणतेही नातं फार काळ टिकत नाही.
जया बच्चन पुढे म्हणाल्या, 'आजच्या नात्यात भावना आणि रोमान्स कमी आहे. माझं म्हणणं आहे की तू तुझ्या जिवलग मित्राशी लग्न कर. जर तुम्हाला तुमचा मित्र आवडत असेल तर तुम्ही त्यांना स्पष्टपणे सांगा की 'मला आपल्या दोघांचं मुल झालेलं आवडेल, कारण मला तू आवडतोस'. लग्न न करताही तुला मूल झाले तरी मला काही अडचण नाही. जया बच्चन यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलंय.