Join us

Jaya Bachchan यांनी पापाराझींना दिल्या शिव्याशाप, व्हिडिओ पाहून लोक संतापले; म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 12:15 PM

जया बच्चन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये त्या पापाराझींना शिव्याशाप देताना दिसत आहे.

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री आणि प्रसिद्ध राजकारणी जया बच्चन(Jaya Bachchan)  अनेकदा त्यांच्या रागामुळे चर्चेत असतात. यामुळे त्या सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल होताना दिसल्या आहेत. पुन्हा एकदा जया बच्चन अशाच काही कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. नुकताच जया बच्चन यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये त्या पापाराझींवर चिढलेल्या दिसतायेत. 

यादरम्यान, त्यांनी पापाराझींना असे काही म्हटले आहे, जे ऐकून सोशल मीडिया नेटकरी चांगलेच संतापले आहेत.

जया बच्चन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्या नात नव्या नवेली नंदासोबत एका कार्यक्रमात दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्या पापाराझींना पाहून पोझ देण्यास थांबल्या नाही तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करत पुढे निघून गेल्या. यानंतर, त्यांनी पापाराझींना शिव्याशाप दिल्या पण नेमका त्यांना कोणत्या गोष्टीचा राग आला हे कळलेच नाही. 

व्हिडिओमध्ये जया बच्चन पापाराझींकडे बोट दाखवत म्हणते की, '  तुम्ही डगमगून खाली पडावं... जया बच्चन यांचं हे बोलणं ऐकून आजूबाजूच्या लोकांनाही आश्चर्य वाटले. व्हिडिओमध्ये त्यांची नात नव्या देखील लाजिरवाणं झालं.  इतकेच नाही तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये जया बच्चन  संतप्त चेहरा करताना दिसत आहे.

नेटकरी संतापलेजया बच्चन यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांचं हे वागणे अनेकांना अजिबात आवडले नाही. अनेक युजर्सनी असेही म्हटले की - 'एवढा मोठ्या स्टार असूनही पापाराझींना असे बोलायला लाज वाटली नाही का?'. जया बच्चन यांच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांना जोरदार टीका केली आहे. 

टॅग्स :जया बच्चनसेलिब्रिटी