Join us  

"माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं", बिग बींशी लग्न केल्यानंतर जया बच्चन यांचे वडील असं का म्हणाले होते?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 1:14 PM

जया बच्चन यांच्या वडिलांना मान्य नव्हतं त्यांचं लग्न, जावई म्हणून पसंत नव्हते अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याकडे बॉलिवूडमधील आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. बिग बी आणि जया बच्चन यांनी ३ जून १९७३ रोजी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. अत्यंत साध्या पद्धतीने आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. पण, जया बच्चन यांच्या कुटुंबीयांना मात्र हे लग्न मान्य नव्हतं. जया बच्चन यांच्या वडिलांना जावई म्हणून अमिताभ पसंत नव्हते. हरिवंशराय बच्चन यांनीच याबाबत खुलासा केला होता. 

हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या 'इन द आफ्टरनून ऑफ टाइम' या पुस्तकात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला होता. जया बच्चन यांच्या मलबार हिल्स येथील स्कायलार्क बिल्डिंगमधील आलिशान फ्लॅटमध्ये त्यांच्या लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. खरं तर जया बच्चन यांच्या कुटुंबीयांना बंगाली प्रथांनुसार लग्न लावायचं होतं. पण, जया बच्चन यांचं हे लग्न कुटुंबीयांना मान्य नव्हतं. त्यांच्या लग्नात जया बच्चन सोडल्या तर बाकी कोणीच खूश नव्हतं. 

अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबीयांचं स्वागतही अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आलं होतं. लग्न झाल्यानंतर बिग बींचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी जया बच्चन यांच्या वडिलांना अमितभा बच्चन यांच्यासारखा जावई मिळाल्याचं म्हणत शुभेच्छा दिल्या होता. त्यांची गळाभेट ही घेतली होती. पण, जया बच्चन यांच्या वडिलांना बिग बी जावई म्हणून पसंत नव्हते. तेदेखील आपल्याला शुभेच्छा देतील असं हरिवंशराय यांना वाटलं होतं. पण, त्यांची घोर निराशा झाली. "माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं", असं जया बच्चन यांचे वडील म्हणाले. 

आता अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांना अभिषेक आणि श्वेता ही दोन मुलं आहेत. अभिषेकने ऐश्वर्या रायबरोबर संसार थाटला आहे. 

टॅग्स :अमिताभ बच्चनजया बच्चनसेलिब्रिटी