जया बच्चन यांची 'या' गोष्टीमुळे उडाली झोप, थेट मुंबई पोलिसांची घ्यावी लागली मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 04:42 PM2020-07-25T16:42:36+5:302020-07-25T16:55:50+5:30
11 जुलैला उशीरा रात्री अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन मुंबईतील नानावटी रुग्णालयात गेले होते. त्यावेळी अभिषेक बच्चनला थोडा ताप होता आणि अमिताभ बच्चन यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. दोघांनी कोरोनाची टेस्ट केली होती आणि त्यात दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले.
काही बाईकस्वार मध्यरात्री परिसरात जोर जोराने आवाज करत बाईक चालवतात. या मुलांमुळे नाहक लोकांना त्रास करावा लागत आहेत. क्वारंटाईनमध्ये राहणारी जया बच्चन बाईकच्या आवाजामुळे त्यांची झोपच उडाली आहे. रात्री अपरात्री या मुलांचा परिसरात दंगा सुरू असतो. त्यामुळे जया बच्चन यांनी थेट मुंबई पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने बाईकचीचे नंबर शोधून काढले आहेत. आता या तरूणांचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांनी सांगितले आहे की जया बच्चन आधीच अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खूपच तणावात आहेत आणि बाईकच्या मोठ्या आवाजामुळे त्यांचा त्रास आणखीन वाढला आहे.
लॉकडाऊनमुळे आणि निर्जन रस्तामुळे रात्रीच्या वेळी मुलांची शर्यत होते असे सांगितले जात आहे. जलसा बंगल्याच्या आसपास रस्त्यावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याने या तरूणांचा व्हिडीओ पोलिसांनी मिळवला आहे.परिसरात या तरुणांना पकडण्यासाठी रात्री नाकाबंदी केली जात आहे, परंतु अद्यापपर्यंत त्यांना पकडण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही.
अमिताभ बच्चन गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसशी सामना करत आहेत. दरम्यान त्यांच्याबद्दल अफवा पसरली होती की ते बरे झाले आहेत. असेही बोलले जात आहे की त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे आणि त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. पण अमिताभ बच्चन यांनी स्वतःच ट्विट करत अफवांना पूर्णविराम लावला आहे. अमिताभ बच्चन सध्या मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल आहेत. अशी अफवा पसरली होती की कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आता बिग बी 2-3 दिवसांत घरी परतणार आहेत. अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत लिहिले की, हे वृत्त चुकीचे, बेजबाबदार, बनावट आणि गंभीर खोटे असल्याचे स्पष्ट केले होते.