Join us  

Kangana Ranaut : कंगनाला पाहताच जया बच्चन असं काही वागल्या की सुरू झाली चर्चा, पाहा Shocking VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 11:30 AM

Uunchai Special Screening Watch Shocking Video : ‘ऊंचाई’च्या स्क्रिनिंगला अक्षय कुमार, सलमान खान, भाग्यश्री अशा बड्या स्टार्सनी हजेरी लावली. पण सर्वाधिक चर्चा झाली ती जया बच्चन व कंगना राणौत या दोघींची.

Uunchai Special Screening : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी,  डॅनी डेन्झोंगपा, परिणीती चोप्रा आणि नीना गुप्ता यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘ऊंचाई’ या चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग काल पार पडलं. या स्क्रिनिंगला अक्षय कुमार, सलमान खान, भाग्यश्री अशा बड्या स्टार्सनी हजेरी लावली. पण सर्वाधिक चर्चा झाली ती जया बच्चन (Jaya Bachchan) व कंगना राणौत (Kangana Ranaut ) या दोघींची. होय, या इव्हेंटमध्ये जया बच्चन यांनी कंगनाकडे साफ दुर्लक्ष केलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

बुधवारी रात्री मुंबईत ‘ऊंचाई’चं स्पेशल स्क्रिनिंग झालं. याचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओत अनुपम खेर सर्व पाहुण्यांचं स्वागत करत आहेत. याचदरम्यान पोपटी साडी नेसलेल्या जया बच्चन यांची एन्ट्री होते. योगायोग म्हणजे, जया बच्चन यांच्या मागेच कंगना उभी होती.

जया व कंगना अशा एकाच स्टेजवर एकत्र आलेल्या पाहून पापाराझी कंगना...कंगना... असं ओरडायला लागले. पण जया यांनी कंगनाकडे नजर वर करून पाहण्याचीही तसदी घेतली नाही. त्यांनी कंगनाकडे साफ दुर्लक्ष केलं. यावेळी जया बच्चन यांच्या चेहऱ्यावरचे त्रासिक भावही सगळ्यांनी नोटीस केले.  कंगनाकडे दुर्लक्ष करत जया यांनी भाग्यश्रीची गळाभेट घेतली. मिसेस बच्चन आपल्याकडे दुर्लक्ष करतेय, हे कंगनाच्या देखील लक्षात आलं. तिच्या चेहऱ्यावरचे भाव यावेळी पाहण्यासारखे होते.

जया बच्चन यांनी कंगनाकडे साफ दुर्लक्ष केलं असलं तरी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन हा मात्र प्रेमाने कंगनाना भेटला. गळाभेट घेऊन त्याने तिचं स्वागत केलं.सध्या कंगना व जया बच्चनच्या या व्हिडीओची जबरदस्त चर्चा आहे. या व्हिडीओवर युजर्सनी एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

‘ऊंचाई’च्या स्पेशल स्क्रिनिंगला सलमान, अक्षय कुमार हेही हजर होते. सलमान खान दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा हात हातात घेऊन स्क्रिनिंगला पोहोचला. अक्षय कुमारही यावेळी बोनी कपूर यांच्याशी हास्यविनोद करताना दिसला. राणी मुखर्जी, काजोल,   रितेश देशमुख आणि शहनाज गिल सारखे सेलिब्रिटी यावेली हजर होते.

‘ऊंचाई’ या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांच्याशिवाय परिणीती चोप्रा, अनुपम खेर, बोमन इराणी, डॅनी डेन्झोंगपा आणि सारिका यांच्या मुख्य भूमिका आहेत. सूरज बडजात्या दिग्दर्शित हा चित्रपट चार मित्रांमधील कथा आहे. हा चित्रपट 11 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :कंगना राणौतजया बच्चनअनुपम खेरअमिताभ बच्चनअभिषेक बच्चन