Join us

'हे काय नाव आहे?', जया बच्चन यांची अक्षय कुमारच्या 'टॉयलेट एक प्रेम कथा' सिनेमावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 10:14 IST

'मी तर नाही पाहणार अशा नावाचा सिनेमा', जया बच्चन असं का म्हणाल्या?

अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) त्यांच्या संतापी स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात. संसदेत त्यांच्या रागाची झलक सर्वांनीच पाहिली आहे. तसंच पापाराझींसमोरही त्या नेहमीच व्हिडिओग्राफर्सना सुनावताना दिसतात. आता त्यांनी अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) सिनेमाला ट्रोल केलं आहे. त्यांनी केलेली टिप्पणी नक्कीच अक्षयला आणि सिनेमाच्या मेकर्सला टोचणारी आहे. जया बच्चन यांनी एका वृत्तवाहिनीच्या इव्हेंटमध्ये बातचीत करताना प्रतिक्रिया दिली आहे. 

'इंडिया टीव्ही'च्या कार्यक्रमात जया बच्चन यांनी हजेरी लावली. प्रशासन आणि सामाजिक मुद्द्यांवरील सिनेमाबाबतीत जया बच्चन यांना  प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन' आणि 'टॉयलेट एक प्रेम कथा' या सिनेमांचं उदाहरण दिलं. त्या म्हणाल्या, "आता तुम्ही या सिनेमांचं नाव पाहा. मी तर असेल सिनेमे कधीच पाहणार नाही. टॉयलेट एक प्रेम कथा, हे काय नाव आहे? सिनेमाचं टायटल असं? कृपया तुम्हीच मला सांगा तुमच्यापैकी किती जण अशा नावाचा सिनेमा बघाल?" जया बच्चन यांच्या या प्रश्नावर काही जणांनीच हात वर केला. त्या म्हणाल्या, 'सिनेमा फ्लॉप आहे'. 

'टॉयलेट एक प्रेम कथा' सिनेमा स्वच्छ भारत अभिनयानाला पाठिंबा देण्यासाठी बनवण्यात आला होता. ११ ऑगस्ट २०१७ रोजी सिनेमा रिलीज झाला. ७५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने २०० कोटींचा गल्ला जमवला होता. अक्षय कुमारसोबत भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत होती. तसंच यातील गाणीही गाजली होती. 

टॅग्स :जया बच्चनअक्षय कुमारबॉलिवूड