Join us

जया बच्चन यांनी बिग बींसोबतच्या नात्याबाबत केला खुलासा, म्हणाल्या - "मी माझ्या पतीपासून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 12:54 IST

नव्या नवेली नंदा(Navya Naveli Nanda)चा पॉडकास्ट आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचला आहे. 'व्हॉट द हेल नव्या' (What The Hell Navya 2)चा दुसरा सीझन लवकरच निरोप घेणार आहे आणि नुकताच नव्याने शेवटच्या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत नव्या तिची आजी जया बच्चन (Jaya Bachchan) आणि आई श्वेता बच्चन (Shweta Bachchan) यांच्यासोबत मैत्रीवर बोलताना दिसली.

नव्या नवेली नंदा(Navya Naveli Nanda)चा पॉडकास्ट आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचला आहे. 'व्हॉट द हेल नव्या' (What The Hell Navya 2)चा दुसरा सीझन लवकरच निरोप घेणार आहे आणि नुकताच नव्याने शेवटच्या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत नव्या तिची आजी जया बच्चन (Jaya Bachchan) आणि आई श्वेता बच्चन (Shweta Bachchan) यांच्यासोबत मैत्रीवर बोलताना दिसली. पॉडकास्ट दरम्यान जया बच्चन यांनी त्यांचे अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला.

प्रोमोच्या सुरूवातीला जया बच्चन सांगताना दिसत आहेत की, माझे सर्वात चांगले मित्र माझ्या घरात आहेत. त्यानंतर नव्या बोलताना दिसते आहे की, जर दोन लोक फक्त मित्र आहेत आणि ते दोघे मैत्रीमध्ये रोमांस घेऊन आले, तर ते योग्य आहे का? जया बच्चन म्हणाल्या की, हे योग्य आहे. माझा नवरा माझा सर्वात चांगला मित्र आहे आणि मी त्यांच्यापासून कोणतीच गोष्ट लपवत नाही. नव्या म्हणाली की, जेव्हा आजीचे फ्रेंड्स घरी येतात तेव्हा ते आजीसोबत ज्या पद्धतीने बोलतात तसे आम्ही बोलू शकत नाही. हे पाहून मला खूप मज्जा येते. कारण ते आजीला त्रास देतात.

श्वेतानेदेखील मैत्रीवर केलं भाष्यश्वेता म्हणाली की, मला माहित नाही की लोक असे का बोलतात की त्यांची मुलं त्यांचे सर्वात चांगले मित्र आहेत? जया बच्चन म्हणाल्या, मात्र तुमची मुलं तुमचे चांगले मित्र का नाही बनू शकत? श्वेता म्हणाली की, आपण फ्रेंड्स नाहीत. तू माझी आई आहेस. आपल्यामध्ये एक मर्यादा आहे जी मी ओलांडू शकत नाही. नव्या म्हणाली की, तू आई आहे आणि तुम्हीपण आई आहात मग तुम्ही मैत्रिणी बनू शकता. श्वेता म्हणाली की, माझी मुलं माझी मुलं आहेत आणि माझे फ्रेंड्स माझे फ्रेंड्स आहेत.   

टॅग्स :जया बच्चननव्या नवेलीअमिताभ बच्चन