Join us

जया बच्चन यांचे ते शब्द ऐकून ऐश्वर्या रायला आवरले नाहीत अश्रू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 15:43 IST

जया यांनी चारचौघात वापरलेल्या त्या शब्दांमुळे ऐश्वर्या रायच्या डोळ्यांत पाणी आले होते. 

ठळक मुद्देफिल्मफेअर पुरस्काराच्या या व्हिडिओमध्ये जया बच्चन स्टेजवर सगळ्यांच्या समोर ऐश्वर्या रायचे कौतुक करताना दिसत आहेत. ऐश्वर्या केवळ एक चांगली अभिनेत्रीच नव्हे तर एक खूप चांगली सून देखील आहे असे त्या या व्हिडिओत बोलताना दिसत आहेत.

ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांना अनेक समारंभात एकत्र पाहिले जाते. त्या दोघींमध्ये खूपच छान नातं असल्याचे म्हटले जाते. जया यांनी चारचौघात केलेल्या कौतुकामुळे चक्क ऐश्वर्या रायच्या डोळ्यांत पाणी आले होते. 

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच भारतात लॉकडाऊन असल्यामुळे सगळेच आपापल्या घरात बसून घरातल्यांसोबत वेळ घालवत आहेत. अनेकजण सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. सोशल मीडियावर सध्या अनेक जुने व्हिडिओ व्हायरल झाले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

फिल्मफेअर पुरस्काराच्या या व्हिडिओमध्ये जया बच्चन स्टेजवर सगळ्यांच्या समोर ऐश्वर्या रायचे कौतुक करताना दिसत आहेत. ऐश्वर्या केवळ एक चांगली अभिनेत्रीच नव्हे तर एक खूप चांगली सून देखील आहे असे त्या या व्हिडिओत बोलताना दिसत आहेत. ऐश्वर्या ही खूप चांगले संस्कार असणार मुलगी असून अशा गोड मुलीची मी सासू होत आहे याबद्दल मला आनंद आहे... ऐश्वर्या बच्चन कुटुंबियात तुझे स्वागत आहे असे देखील त्या या व्हिडिओत म्हणत आहेत.

जया बच्चन यांचे हे शब्द ऐकून ऐश्वर्याला तिचे अश्रू आवरत नसल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ खूपच जुना असून या व्हिडिओत आपल्याला श्वेता बच्चन नंदाला देखील पाहायला मिळत आहे. ती देखील भावुक झाली असल्याचे दिसून येत आहे.

ऐश्वर्या ही अमिताभ बच्चन आणि जया बच्चन या दोघांची प्रचंड लाडकी असून ती अनेकवेळा त्यांच्यासोबत आपल्याला सार्वजनिक ठिकाणी दिसते.  

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनजया बच्चन