महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) हिचा पॉडकास्ट नेहमी चर्चेत असतो. या पॉकास्टमध्ये ती आजी जया बच्चन (Jaya Bachchan) आणि आई श्वेता नंदा (Shweta Nanda) यांच्याशी फेमिनिझम विषयावर मनमोकळेपणाने संवाद साधते. अनेकदा या पॉकास्टमधील जया बच्चन यांची काही विधानं चर्चेत आली आहेत. आता पु्न्हा एकदा त्यांच्या एका वक्तव्याची चर्चा आहे. डेटवर गेल्यानंतर पुरुषांनीच बिल भरलं पाहिजे असं त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक महिलांनी भुवया उंचावल्या आहेत.
नव्या नवेली नंदाचा 'व्हॉट द हेल नव्या'या पॉडकास्टचा लेटेस्ट एपिसोड नुकताच रिलीज झाला. यामध्ये नव्यासोबत जया बच्चन आणि श्वेता नंदा सामील झाल्या. फेमिनिझमवर बोलताना नव्या म्हणाली, "महिला आता जास्त सशक्त झाल्या आहेत. अनेक गोष्टी त्या स्वतंत्र्याने करत आहेत. जसं की जर मुलगी डेटवर गेली तर मुलगाच बिल भरतो. पण आता मुलीला हे पटत नाही."
नव्याचं बोलणं मध्येच थांबवत जया बच्चन म्हणाल्या, "किती वेड्या आहेत त्या मुली. उलट मला तर वाटतं की पुरुषांनीच बिल दिलं पाहिजे."
यानंतर नव्याने प्रश्व विचारला की, 'तुम्हाला तेव्हाच्या आणि आताच्या पुरुषांमध्ये काय फरक दिसतो?' यावर श्वेता नंदा म्हणाली, "आमच्यावेळी अशीच धारणा होती की पुरुष कायम मजबूत असला पाहिजे आणि त्याने शांत राहिलं पाहिजे. डेटिंग करत असतानाही तुम्हाला मुलगा कधी प्रपोज करतो याची वाट पाहावी लागायची. तोच येणार आणि प्रपोज करणार अशीच समज होती." यावरही जया बच्चन यांनी मत मांडताना सांगितलं की, "बरोबरच आहे. मुलानेच आधी प्रपोज केलं पाहिजे. नाहीतर मला तर खूप विचित्र वाटेल."
नव्याच्या पॉडकास्टमध्ये यावेळी तिचा भाऊ अगस्त्य नंदाही आला होता. नुकतंच त्याने 'द आर्चीज' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानेही शोमध्ये पुरुषत्वाबाबतीत आपले विचार मांडले.