Join us

जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 11:10 IST

सिद्धांत चतुर्वेदी आणि वामिका गब्बी यांच्यासोबत त्या एका सिनेमात दिसणार आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांना बरेचदा आपण गंभीर मूड मध्येच पाहतो. पापाराझींसमोर तर त्या कायम चिडलेल्याच दिसतात. यामुळे त्यांना ट्रोलही केलं जातं. मात्र पहिल्यांदाच त्यांचा हसरा, दिलखुलास मूड कॅमेऱ्यात कॅप्चर झाला आहे. आगामी सिनेमाच्या निमित्ताने त्यांचा लूक समोर आला आहे.  सिद्धांत चतुर्वेदी आणि वामिका गब्बी यांच्यासोबत त्या अपकमिंग 'दिल का दरवाजा खोल ना डार्लिंग' या सिनेमात दिसणार आहेत.

सिनेमाच्या निर्मात्यांनी दोन नवीन पोस्टर्स शेअर केले आहेत. या पोस्टरमध्ये जया बच्चन दिलखुलास हसताना दिसत आहेत. याआधी कधीही न पाहिलेल्या लूकमध्ये त्या दिसत आहेत. ब्लॅक पँट, व्हाईट शर्ट आणि ब्लॅक स्टोल त्यांनी गळ्यात घातला आहे. त्यांच्या हातात माईक आहे आणि त्या काहीतरी बोलताना दिसत आहेत. त्यांच्या एका बाजूला सिद्धांत चतुर्वेदी तर दुसऱ्या बाजूला वामिका गब्बी आहे. नाचगाण्याचा हा माहोल दिसत आहे. दुसऱ्या पोस्टरमध्ये तर जया बच्चन शाहरुखसारखी पोजही देत आहेत आणि वामिकाकडे बघत आहेत. हे पोस्टर अगदी GENZ लोकांना आवडेल असं आहे. 

पोस्टरमध्ये हरमन बावेजाही दिसत आहे. मेकर्सने पोस्टर शेअर करत लिहिले, 'अनलॉकिंग लव्ह अँड लाफ्टर, दिल का दरवाजा खोल ना डार्लिंग, २०२५ रिलीज, तुम्ही चावी फिरवायला तयार आहात का". जया बच्चन यांना असं हसताना पाहून नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटले, 'मला दोन वेळा पाहून कन्फर्म करावं लागलं की या नक्की जया बच्चनच आहेत ना?','अशक्य! या जया बच्चन नाहीत कारण की त्या हसत आहेत'.

'दिल का दरवाजा खोल ना डार्लिंग' सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे. सिनेमाचं शूट गोव्यात सुरु आहे. यामधून वामिका आणि सिद्धांत ही फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :जया बच्चनसिद्धांत चतुर्वेदीबॉलिवूड