जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरच्या चित्रपटाचे नाव झाले फायनल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 6:50 AM
हे तर आतापर्यंत जगजाहिर झाले आहे की जान्हवी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. आता या चित्रपटाचे नाव मेकर्सनी ...
हे तर आतापर्यंत जगजाहिर झाले आहे की जान्हवी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. आता या चित्रपटाचे नाव मेकर्सनी फायनल केले आहे ज्यातून जान्हवी बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. धडाकमधून जान्हवीसह शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर देखील बॉलिवूडमध्ये डेब्यू करतो आहे. गेल्या काही दिवसांपासून जान्हवी आणि ईशानच्या अफेअरची मीडियामध्ये खूप चर्चा आहे. लंच, डिनर, पार्टिच्या ठिकाणी दोघांना अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाची शूटिंग डिसेंबरमध्ये सुरु करण्यात येणार. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करतो आहे तर शशांक खेतान दिग्दर्शन करणार आहे. चित्रपटात ईशांत एका दलित मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर जान्हवी उच्चवर्णीय म्हणजेच ब्राह्मण समाजातील मुलीच्या भूमिकेत असेल. दोघांमध्ये प्रेम दाखविण्यात येणार असून, पुढे सैराटप्रमाणेच त्याचा क्लायमॅक्स असेल. समाजातील जातीय बंधने दाखविण्यासाठी उदयपूरमधील ग्रामीण भागाची निवड करण्यात आली आहे. ईशांत आणि जान्हवीच्या प्रेमकथेतील काही भाग आणि काही गाणे उदयपूरमध्येच शूट केले जाणार आहेत. रिपोर्टनुसार हा चित्रपट पुढच्या वर्षी जून किंवा जुलैमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा चित्रपटात मराठी चित्रपट सैराटचा हिंदी रिमेक असणार आहे. या चित्रपटाचे राईट्स करण जोहरने नागराज मंजुळेकडून विकत घेतले आहेत. सैराट हा चित्रपट 29 एप्रिव 2016मध्ये रिलीज करण्यात आला होता. कमी बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला जमावला होता.ALSO READ : ईशान खट्टरसोबत पुन्हा स्पॉट झाली जान्हवी कपूर, कॅमेरे दिसताच वेगवेगळ्या वाटेवरून गाठले घर !जान्हवी कपूर ‘मिस्टर इंडिया’च्या सीक्वलमध्ये दिसणार असल्याचे समजते. यात ती श्रीदेवीसोबत काम करताना दिसेल. या सीक्वलमध्ये दोन जोड्या असतील. मिस्टर इंडिया’चा सीक्वल रवी उद्धावर डायरेक्ट करणार आहे. पहिली जोडी कॉमन जोडी. अर्थातच श्रीदेवी आणि अनिल कपूर यांची. तर दुसºया जोडीत यंग स्टार्स दिसतील. यात जान्हवी कपूर हिरोईनची भूमिका साकारताना दिसेल. निर्माते बोनी कपूर यांनीही या चित्रपटाचा सीक्वल बनवण्याची इच्छा बोलून दाखवली होती.