‘धडक’ संपायच्याआधीच जान्हवी कपूरच्या झोळीत दुसरा चित्रपट! रणवीर सिंगसोबत जमणार जोडी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 5:38 AM
श्रीदेवी आणि जान्हवी कपूरची मुलगी जान्हवी कपूर हिला बॉलिवूडचा सूर गवसला असे म्हणायला हरकत नाही. होय, कारणही तसेच आहे. ...
श्रीदेवी आणि जान्हवी कपूरची मुलगी जान्हवी कपूर हिला बॉलिवूडचा सूर गवसला असे म्हणायला हरकत नाही. होय, कारणही तसेच आहे. एक चित्रपट संपायच्याआधीच जान्हवीच्या हाती दुसरा चित्रपट लागलाय. होय, ‘धडक’ हा सिनेमा हातावेगळा करताच जान्हवी नव्या चित्रपटात बिझी होणार आहे. हा चित्रपट कुठला तर तेलगू चित्रपट ‘टेम्पर’चा हिंदी रिमेक. ‘टेम्पर’वरून काही आठवले? नाही ना! तर आम्हीच तुम्हाला सांगतो़ ‘टेम्पर’च्या हिंदी रिमेकचे नाव आहे, ‘सिम्बा’. होय, तोच तो रणवीर सिंगचा ‘सिम्बा’. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात रणवीरसोबत जान्हवीची वर्णी लागल्याची खबर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सिम्बा’मधील जान्हवीच्या भूमिकेत बदल करत, ती अधिक प्रभावी करण्यात आली आहे. ओरिजनल तेलगू चित्रपटात पित्तृसत्ताक पार्श्वभूमीमुळे हिरोईनची भूमिका फार प्रभावी नव्हती. पण ‘सिम्बा’मध्ये हिरोईनची भूमिकाही हिरोइतकीच तगडी असणार आहे. ‘टेम्पर’मध्ये ज्युनिअर एनटीआर आणि काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत होते. ‘सिम्बा’ ही जागा रणवीर सिंग आणि जान्हवी घेणार आहेत. करण जोहर ‘सिम्बा’चा सहनिर्माता आहे. त्यानेच या चित्रपटासाठी जान्हवीचे नाव सुचवल्याचे कळते. पुढीलवर्षी २८ डिसेंबरला ‘सिम्बा’ रिलीज होणार आहे. म्हणजेच, या चित्रपटाला ख्रिसमससोबतच नव्या वर्षााचाही फायदा मिळणार आहे. रणवीरचा ‘पद्मावत’ हा चित्रपट कालच रिलीज झाला़ यानंतर रणवीर लगेच ‘गली ब्वॉय’मध्ये बिझी झालायं. या चित्रपटात तो रॅपरची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटासोबतच रणवीर ‘सिम्बा’चे शूटींग सुरु करणार आहे.ALSO READ : OMG ! रणवीर सिंगने केली ‘या’ अभिनेत्याच्या २३ वर्षांपूर्वीच्या लूकची कॉपी!!‘सिम्बा’मध्ये रणवीरचा लांबलचक मिशी असलेला लूक यापूवीर्ही आपण पाहिलाय. १९९४ मध्ये आलेल्या ‘मिस्टर आझाद’ या चित्रपटात अनिल कपूर अशाच लूकमध्ये दिसला होता. यात अनिलही एका पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत होता. ‘मिस्टर आझाद’मधील अनिल आणि ‘सिम्बा’मधील रणवीरचा लूक एकदम मिळताजुळता आहे.