मुंबई - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा बहुचर्चित ‘झुंड’ प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी त्याचं कौतूक केलं. तर, काहींनी या चित्रपटावर टीकाही केली. अगदी बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान पासून साऊथचा सुपरस्टार धनुषपर्यंत सगळ्यांनी ‘झुंड’ (Jhund) बनवणाऱ्या नागराज यांची पाठ थोपटली. मराठी अभिनेता सुबोध भावे, जितेंद्र जोशी, अभिनेता सिद्धार्थ जाधवनेही नागराजचं तोंड भरुन कौतूक केलंय. आता, मराठीतील चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीनेही नागराज आणि झुंडबद्दल मत व्यक्त केलं आहे.
स्वप्नीलने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन #AskmeAnythingh सेशन ठेवला होता. या वेळेत चाहत्यांनी स्वप्नील जोशीला काही प्रश्न विचारली. त्या प्रश्नांना स्वप्नीलने उत्तर दिली आहेत. त्यापैकी, एका चाहत्याने, दादा झुंडबद्दल काही? असा प्रश्न केला होता. त्यावर, स्वप्नीलने मनमोकळेपणाने उत्तर दिलं. नागराज कमाल आहे, झुंड कमाल आहे, तो खूप महत्त्वाचा चित्रपट आहे, Loved it..., असा ट्विट रिप्लाय स्वप्नील जोशीने केला आहे.
या सेशनमध्ये एका चाहत्याने द काश्मीर फाईल्स या चित्रपटाबद्दलही स्वप्नील जोशीला प्रश्न विचारला होता. त्यावर, चित्रपटाबद्दल खूप छान गोष्टी ऐकल्या आहेत, त्या थेअटरमध्येच पाहाव्या लागतील, असे स्वप्नीलने म्हटले. तसेच, या चित्रपटात तू भूमिका करशील का? असाही प्रश्न एकाने विचारला होता. त्यास, एक अभिनेता म्हणून नक्कीच मला आनंद होईल, असे उत्तर स्वप्नीलने दिले आहे.
झुंडबद्दल कायम म्हणाला जितेंद्र जोशी
अभिनेता जितेन्द्र जोशी ( Jitendra Joshi) याने तर या चित्रपटाच्या निमित्ताने नागराजवर कौतुकाचा वर्षाव केला. जितेन्द्रने नागराज यांच्यासोबतीने इन्स्टावर लाईव्ह येत, ‘झुंड’सारखा सिनेमा फक्त नागराजचं करू शकतो. तू महानायक आणि महामानवाला एका फ्रेममध्ये आणलंस...,’ अशा शब्दांत त्याने नागराजचं कौतुक केलं. तर, दुसरीकडे अभिनेता सिद्धार्थ जाधवनेही तुम्ही आमचं अस्तित्व नाकारुच शकत नाहीत, असे म्हणत नागराज मंजुळे भावा... अप्रतिम असे म्हटले.