Join us

Jiah Khan Death Anniversary : जिया खान होती चार महिन्यांची गरोदर, सुरज पांचोलीने भ्रूण फेकले होते टॉयलेटमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 12:14 PM

जिया खानचा खटला सुरू असताना सुरज आणि जियाच्या नात्याविषयी अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. जिया आणि सुरज अनेक महिने नात्यात होते.

ठळक मुद्देगोळ्यांनी पूर्णपणे अबॉर्शन न झाल्याने जियाला रुग्णालयात लगेचच दाखल करणे आवश्यक होते. पण सुरजने तिला रुग्णालयात न देता भ्रूण स्वतःच्या हाताने काढून टॉयलेटमध्ये फेकून दिले होते. 

बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने सन २०१३ मध्ये आजच्याच दिवशी आत्महत्या करून आयुष्य संपवले होते. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी जगाला अलविदा म्हणणाऱ्या जियाच्या मृत्यूचे रहस्य अद्यापही उलगडलेले नाही. तिच्या आत्महत्या प्रकरणी तिचा कथित बॉयफ्रेन्ड सूरज पांचोलीला अटक करण्यात आली होती. सध्या सूरज जामिनावर बाहेर आहे. जिया खान प्रकरणाचा खटला अजूनही सुरू आहे.

जिया खानचा खटला सुरू असताना सुरज आणि जियाच्या नात्याविषयी अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. जिया आणि सुरज अनेक महिने नात्यात होते. एवढेच नव्हे तर ती चार महिन्यांची गरोदर होती. जियाच्या आत्महत्येनंतर काही दिवसांनी मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, २०१३ मध्ये जियाच्या निधनाच्या काही महिने आधी ती गरोदर होती. सुरजला ही गोष्ट तिने सांगितल्यानंतर ते दोघे डॉक्टरकडे गेले होते. जियाला डॉक्टरांनी अबॉर्शनसाठी काही औषधं लिहून दिली होती. पण ही औषधं अतिशय स्ट्राँग असल्याने तिला खूपच त्रास होत होता. गोळ्यांनी पूर्णपणे अबॉर्शन न झाल्याने तिला रुग्णालयात लगेचच दाखल करणे आवश्यक होते. पण सुरजने तिला रुग्णालयात न देता भ्रूण स्वतःच्या हाताने काढून टॉयलेटमध्ये फेकून दिले होते. 

सुरजला त्यावेळी बॉलिवूडमध्ये आपले करियर करायचे होते. जियाला रुग्णायलात दाखल केले असता ही गोष्ट मीडियापर्यंत पोहोचली असती आणि त्याचे करियर धोक्यात आले असते. त्यामुळेच त्याने ही गोष्ट केली असल्याचे मुंबई मिररने त्यांच्या वृत्तात म्हटले होते. 

२००७ साली ‘नि:शब्द’ या सिनेमाद्वारे बॉलिवूड करिअरला सुरुवात करणारी जिया काम मिळत नसल्यामुळे नैराश्येने ग्रस्त होती. अखेर तिने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली, असे काही जणांचे म्हणणे आहे. तर काहींच्या मते, बॉयफ्रेंडसोबत निर्माण झालेल्या दुराव्यामुळे तिने आत्महत्या केली. जियाची आई राबिया खान यांच्या मते, जियाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे. अद्याप तिच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

टॅग्स :सुरज पांचोली