जितेन्द्र यांचे भाऊ व तेलगू सिने निर्माते नितीन कपूर यांची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2017 4:01 AM
अभिनेते जितेंद्र यांचे भाऊ आणि तेलगू अभिनेत्री-माजी आमदार जयासुधा यांचे पती नितीन कपूर यांनी आपल्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या ...
अभिनेते जितेंद्र यांचे भाऊ आणि तेलगू अभिनेत्री-माजी आमदार जयासुधा यांचे पती नितीन कपूर यांनी आपल्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी ही घटना घडली. अंधेरी येथील सहा मजली इमारतीवरुन उडी मारुन नितीन कपूर यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. नितीन कपूर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचे चुलत भाऊ व तेलगू अभिनेत्री जयसुधा यांचे पती होते. पोलिसांनी नितीन कपूर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. नितीन कपूर यांना नैराश्याने ग्रासले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन कुमार गत १८ वर्षांपासून बेरोजगार होते. त्यांचे कुटुंब हैदराबादेत तर ते मुंबईतील बहीणीच्या घरी राहत. गत दीड वर्षांपासून त्यांची मानसिक प्रकृती ठीक नव्हती.एका रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. घटनास्थळावरून कुठलीही सुसाईड नोट सापडलेली नाही. नितीन कपूर जंपिक जॅक नावाने प्रसिद्ध होते. तेलगू चित्रपटांच्या निर्मीती क्षेत्रात ते होते. जयासुधा आणि नितीन कपूर यांच्या विवाह १९८५ मध्ये झाला होता. त्यांना दोन मुले असून त्यांची नावे निहार आणि श्रेयन अशी आहेत. जयसुधा या आंध्र प्रदेशातील सिकंदराबादच्या आमदार होत्या. तसेच, त्यांनी ७०-८०च्या दशकात तेलगू चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जयासुधा यांनी नितीन यांच्याबद्दल भरभरून बोलल्या होत्या. नितीन यांनी सुद्धा जयासुधा व त्यांच्यात चांगली मैत्री असल्याचे म्हटले होते. मी नितीनला पहिल्या दिवसापासूनच पसंत करत होती. तो स्मार्ट आहे आणि त्याची बोलण्याची पद्धत मला खूप आकर्षित करते. जर मी म्हणेन की, मी त्याला पसंत करत नव्हती तर ते खोटं ठरेल, असे जयासुधा या मुलाखतीत म्हणाल्या होत्या. यावर नितीन यांनीही उत्तर दिले होते. आम्ही आधीपासूनच चांगले मित्र होतो. मी चेन्नई आणि मुंबई दरम्यान येजा करत असताना आमच्यातील नातं सुरू झालं होतं, असे त्यांनी सांगितले होते.