हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र हे बॉलिवूडमधील त्या अभिनेत्यांपैकी एक आहेत ज्यांनी खूप संघर्ष आणि मोठ्या मेहनतीने चित्रपटसृष्टीत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. जितेंद्र यांचे फिल्मी करिअर प्रचंड यशस्वी ठरले. एकापेक्षा एक सुपर डुपर हिट चित्रपटांमध्ये काम करत त्यांना रसिकांची मनं जिंकली होती. बराच काळ इंडस्ट्रीत त्यांचा बोलबाला होता. आज त्यांच्याकडे पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा सगळ्या गोष्टी आहेत. जितेंद्र बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहेत. आता अभिनयापासून दूर असले तरी त्यांचे चाहते आजही त्यांच्यावर तितकेच प्रेम करतात. देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे आजही चाहते आहेत.
जितेंद्र यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता आणि त्यामुळे गरीबी खूप जवळून पाहिली. अशा परिस्थितीतही कधीच हार मानली नाही. मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर आज सर्वात श्रीमंत अभिनेत्याच्या यादीत त्यांचे नाव गणले जाते. पण इथवर पोहचणे त्यांच्यासाठी इतकं सोप्प नव्हतं. करिअरच्या सुरुवातीला अनेक चढउतार आलेत. पहिला चित्रपटावेळी त्यांना केवळ १०० रु इतके मानधन मिळाले होते. १०० रु सुद्धा त्यांना वेळेवर मिळाले नव्हते. १०० रु मिळवण्यासाठीही त्यांना बरीच वाट पाहावी लागली होती.
कधीकाळी १०० रुपये कधी मिळतील याची आतुरतेने वाट पाहणारे जितेंद्र आज मात्र अतिशय श्रीमंत आहेत. जितेंद्र आज कोट्यावधी सपंत्ती मालिक आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, जितेंद्र एकूण 1500 कोटी इतकी संपत्तीचे मालक आहेत.
ज्यात आलिशान बंगला, महागड्या गाड्या आणि इतरही प्रॉपर्टीचा समावेश आहे. त्यांचे जगणंही अतिशय आलिशान आहे. मुलगी एकता कपूर आज यशस्वी निर्माती आहे. तर मुलगा तुषार कपूरनेसुद्ध अभिनेता म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.