Join us

JNU Attack : बोलो अँग्री ओल्ड मॅन, मुंह खोलो....! नेटक-यांना खटकले अमिताभ-अभिषेकचे मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 11:47 AM

जेएनयूमध्ये विद्यार्थी व शिक्षकांवर झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात असंतोषाचे वातावरण आहे. महानायक अमिताभ बच्चन व त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांनी मात्र या मुद्यावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

ठळक मुद्देरविवारी काही अज्ञात लोकांनी जवाहर लाल नेहरू विद्यालय (जेएनयू) परिसरात घूसून  विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला.

जेएनयूमध्ये विद्यार्थी व शिक्षकांवर झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात असंतोषाचे वातावरण आहे. या घटनेच्या निषेधार्थ  बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीही मैदानात उतरले आहेत. काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तर काहींनी प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होत या हल्ल्याची निंदा केली आहे. मात्र महानायक अमिताभ बच्चन व त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांनी या मुद्यावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमिताभ व अभिषेकचे हे मौन अनेक नेटक-यांना खटकले असून यावरून काहींनी दोघांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.जेएनयूमध्ये हल्ला झाल्यानंतर अमिताभ यांनी हात जोडलेला इमोजी ट्विट केला होता. यानंतर काही तासांनी अभिषेक बच्चनने पीस/विक्ट्री इमोजी  ट्विट केला या दोन्ही इमोजीसोबत अमिताभ व अभिषेकने काहीही लिहिले नाही. पण त्यांच्या या ट्विट वर प्रतिक्रियांचा मात्र पाऊस पडला. अनेकांनी यावरून अमिताभ व अभिषेकला ट्रोल केले.

‘सोल आॅफ इंडिया’ नावाच्या एका ट्विटर हॅडलने अमिताभ यांना लक्ष्य केले. ‘मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता बोलने वाले दीवार के विजय आज असल जिंदगी में पूरे पराजय हो चुके हैं। सिर्फ बाबूजी की अग्निपथ कविता पढ़ने से कोई साहसी नहीं होता। आचरण भी करना पड़ता है,’ असे ट्विट या हँडलवरून करण्यात आले.

किलर बिन या ट्विटर हँडलने अमिताभ यांना मिळालेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर ‘अब तो बोल दो सरजी अवार्ड भी मिल गया,’ अशी बोचरी टीका केली. अन्य अनेक युजर्सनीही अमिताभ व अभिषेकला ट्रोल केले.

रविवारी काही अज्ञात लोकांनी जवाहर लाल नेहरू विद्यालय (जेएनयू) परिसरात घूसून  विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आईशी घोष या गंभीर जखमी झाल्या. तर, अनेक विद्यार्थी आणि शिक्षकही जखमी झालेत. देशभर या हल्ल्याचा निषेध होत आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनजेएनयू