जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात आंदोलन होत आहेत. इतकेच नाही तर बॉलिवूडचे कलाकारदेखील हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आहेत. यादरम्यान अभिनेत्री दीपिका पदुकोण विद्यार्थ्यांना पाठींबा देण्यासाठी जेएनयूला पोहचली होती आणि तिथे दहा मिनिटं काहीच न बोलता तिथून निघून गेली. मात्र यावरून सोशल मीडियावर दीपिकाला ट्रोल करण्यात येत आहे. ट्विटरवर #BoycottChhapaak हॅशटॅग ट्रेंड होतो आहे. त्यात आता चित्रपट समीक्षकदेखील दीपिकावर टीका केली आहे.
चित्रपट समीक्षक सुमीत कडेलने दीपिका पदुकोण जेएनयूला विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी गेले म्हणून तिच्यावर निशाणा साधला आहे. सुमीतने त्याचा जुना ट्विट रिट्विट करत लिहिले की, पद्मावतच्या वेळी तू योग्य होती आणि तुम्हाला पाठिंबा दिला होता. मात्र तुकडे तुकडे गँगसोबत सहभागी होऊन तू देशाच्या भावना दुखावल्या आहेस.