Join us  

अधुरी एक कहानी: 9 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर तुटलं जॉन-बिपाशाचं नातं?, अभिनेत्रीने केला होता हैराण करणार खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 6:00 AM

या लव्हस्टोरीला 9 वर्षांनंतर ब्रेक लागला होता. बिपाशाला जॉनसोबत लग्न करायचं असल्याचं बोललं जात होतं, पण...

जॉन अब्राहम (John Abraham) बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. जॉनने बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं एक प्रस्थ निर्माण केले आहे. जॉन आपल्या रिल लाईफबद्दल भरभरून बोलतो. पण आपल्या रिअल लाईफबद्दल बोलणे मात्र त्याला अजिबात आवडत नाही.जॉन आणि प्रिया २०१४ मध्ये विवाहाच्या बंधनात अडकले. पण प्रिया कायम लाईमलाईटपासून दूर राहते. प्रियाच्या आधी जॉन बिपाशा बासूसोबत रिलेशनशिपमध्ये होता. नऊ वर्षे जॉन आणि बिपाशा एकमेकांना डेट करत होते. 

महेश भट्ट यांच्या जिस्ममध्ये सिनेमातील शूटिंग दरम्यान जॉन आणि बिपाशा यांच्यातील जवळीक वाढली. ऐवढेच नाही तर दोघे लिव्हइन रिलेशनशीपमध्ये सुद्धा होते. डिनोनंतर बिपाशाच्या आयुष्यात जॉन अब्राहमची एन्ट्री झाली होती. जिस्मच्या सेटवर दोघांची मैत्री झाली होती आणि पुढे प्रेम झाले.दहा वषार्तील या दोघांचे बॉन्डिंग बघता, हे नाते लग्नाच्या मंडपापर्यंत जाईल, असे मानले जात होते. पण नियतीने काही वेगळेच लिहून ठेवले होते. या लव्हस्टोरीला 9 वर्षांनंतर ब्रेक लागला होता. बिपाशाला जॉनसोबत लग्न करायचं असल्याचं बोललं जात होतं, पण जॉन लग्नात रस दाखवत नव्हता. यामुळे त्यांचे नाते तुटले.

बिपाशा बसूने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'माझ्यासोबत जे काही घडले त्याला फक्त मीच जबाबदार आहे. मी स्वतःला या परिस्थितीत आणले. जो तुम्हाला आयुष्यात खाली ओढण्याचा प्रयत्न करतो तो तुमच्या आयुष्यात नसावा. मी माझं नातं प्रामाणिकपणे जपले होते. बिपाशाने जॉनचे नाव घेतले नसून ती जॉनबद्दल बोलत असल्याचे तिच्या बोलण्यातून स्पष्ट झाले होते.

जॉननंतर बिपाशा ही एप्रिल 2016 मध्ये अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. बिपाशा बासू अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत आनंदी आयुष्य जगते आहे. 

टॅग्स :बिपाशा बासूजॉन अब्राहम