Join us

जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघचा 'वेदा' ओटीटीवर 'या' दिवशी होणार रिलीज, कुठे पाहाल? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 16:40 IST

जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत असलेला 'वेदा' हा सिनेमा १५ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर जादू फिकी पडल्यानंतर आता ओटीटीवर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत असलेला 'वेदा' हा सिनेमा १५ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करता आली नाही. थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्यात आणि त्यांचं मनोरंजन करण्यात जॉन अब्राहमचा 'वेदा' सिनेमा कमी पडला. बॉक्स ऑफिसवर जादू फिकी पडल्यानंतर आता ओटीटीवर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

'वेदा' सिनेमा हा खऱ्या घटनांवर आधारीत आहे. प्रदर्शनाच्या जवळपास २ महिन्यांनी हा सिनेमा ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे थिएटरमध्ये 'वेदा' सिनेमा पाहता न आलेल्या प्रेक्षकांना आता घरबसल्या 'वेदा' सिनेमा पाहता येणार आहे. झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'वेदा' सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा सिनेमा गुरुवारी म्हणजेच १० ऑक्टोबरला ओटीटीवर प्रदर्शित होईल. 

'वेदा'च्या निमित्ताने शर्वरी-जॉन यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं. या दोघांशिवाय अभिषेक बॅनर्जी सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसतोय. याशिवाय ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी, तमन्ना भाटिया सुद्धा सिनेमात विशेष भूमिकेत पाहायला मिळत आहेत. 'वेदा' सिनेमाचं दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केलं आहे. हा सिनेमा १५ ऑगस्ट २०२४ ला सिनेमागृहात रिलीज झाला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ५० कोटींहून अधिकची कमाई केली होती.  

टॅग्स :जॉन अब्राहमसिनेमा