जॉन अब्राहम करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटाची करतोय निर्मिती!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2017 2:16 PM
अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जाणारा अभिनेता जॉन अब्राहम सध्या त्याच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट बनवित आहे. ‘रॉकी हॅण्डसम’, ‘फोर्स’ आणि ‘धूम’ ...
अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जाणारा अभिनेता जॉन अब्राहम सध्या त्याच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट बनवित आहे. ‘रॉकी हॅण्डसम’, ‘फोर्स’ आणि ‘धूम’ या चित्रपटांमध्ये जॉन अॅक्शन भूमिकेत बघावयास मिळाला होता. आता जॉन त्याच्या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत बनविण्यात येत असलेल्या एका हटके चित्रपटात बघावयास मिळणार आहे. सूत्रानुसार जॉन १९९८ साली पोखरण न्यूक्लिअर टेस्टवर आधारित चित्रपट बनविण्याच्या विचारात आहे. ही टेस्ट माजी दिवंगत राष्टÑपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. वास्तविक या विषयावर आतापर्यंत अनेकांनी चित्रपट बनविण्याचा विचार केला, परंतु त्यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली आहे. आता हे धाडस जॉन करीत आहे. हा चित्रपट जॉन अब्राहम, अर्जुन एन. कपूर आणि प्रेरणा अरोरा यांच्याबरोबर प्रोड्यूस करणार आहे. अर्जुन आणि प्रेरणा यांच्या क्रिअर्स एंटरटेन्मेंट प्रॉडक्शन हाउस अंतर्गत ‘रुस्तम’सारख्या अवॉर्ड विनिंग चित्रपटाची निर्मिती केली आहे. दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘तेरे बिन लादेन’चे दिग्दर्शक अभिषेक शर्मा करणार आहेत. जे या विषयावर गेल्या तीन वर्षांपासून रिसर्च करीत आहेत. चित्रपटाची कथा सॅविन क्वाड्रोस आणि संयुक्ता चावला शेख हे लिहिणार आहेत. या जोडीने ‘नीरजा’सारख्या हिट चित्रपटाची कथा लिहिली आहे. याव्यतिरिक्त चित्रपटाविषयी फारशी माहिती समोर आलेली नाही. जॉनने टाइम्स आॅफ इंडियाला आपल्या ड्रिम प्रोजेक्टविषयी सांगितले की, मी चित्रपटाला प्रोड्यूस करण्यास कधीच घाई करीत नाही. मी अशा विषयांना उकरून काढतो जे इंगेजिंग आहेत. ज्याची कथा देशाच्या सोशल, पॉलिटिकल आणि इकॉनॉमिकशी संबंधित आहे. या प्रोजेक्टवर मी प्रेरणा आणि अर्जुनसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचेही जॉनने सांगितले.