बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम सध्या पठाण चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटासाठी त्याने तब्बल २० कोटींचे मानधन घेतले असल्याचे बोलले जात आहे. पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमसोबत शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहेत.
जॉन अब्राहमने हेलमेट डिलिव्हर करायला आलेल्या बॉयला आपल्या चित्रपटात काम दिले आहे. हा डिलिव्हरी बॉय दुसरा तिसरा कोणी नसून हर्षवर्धन राणे आहे. हर्षवर्धन राणे आणि जॉनची भेट १६ वर्षांपूर्वी दिल्लीत झाली होती. त्यावेळी हर्षवर्धन स्ट्रगल करत होता. हर्षवर्धन दिल्लीत डिलिव्हरी बॉयचे काम करत होता.
२००४ साली हर्षवर्धन राणे एका हेल्मेटची डिलिव्हरी घेऊन जॉनकडे गेला होता. पण त्यावेळी हर्षवर्धनला जॉनबद्दल माहिती नव्हती. हळूहळू त्यांची ओळख वाढली आणि आता त्यांच्या मैत्रीला १६ वर्ष झाली आहेत.२०१५ साली जॉनने सत्रह को शादी है चित्रपट बनवायला सुरूवात केली. यात हर्षवर्धन होता. चित्रपटाची कथा कॉमेडी होती. या चित्रपटाचे शूटिंग बराच काळ सुरू होते पण काही कालावधीनंतर शूटिंग थांबवण्यात आले.
‘सनम तेरी कसम’ या चित्रपटामधून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्याने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. हर्षवर्धन आणि जॉनच्या चित्रपटाचे नाव 'बोले तो तारा रा रा' असे आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढच्या वर्षी मार्च महिन्यात सुरू होणार आहे.