जॉन अब्राहम (John Abraham) गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. त्याने 'टॅक्सी नंबर ९२११','दोस्ताना','फोर्स' असे अनेक हिट सिनेमे दिले आहेत. आता लवकरच तो आगामी 'द डिप्लोमॅट' सिनेमात दिसणार आहे. सिनेमाच्या प्रमोशननिमित्त जॉनने सध्याच्या सिनेमांबद्दल, इंडस्ट्रीबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. इंडस्ट्रीमधले लोक आता तितके सेक्युलर राहिले नाहीत असं तो म्हणाला. तसंच त्याने विकी कौशलच्या 'छावा' सिनेमावरही प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाला जॉन अब्राहम?
हॉलिवूड रिपोर्टर इंडियाशी बोलताना जॉन अब्राहम म्हणाला, "मला नाही वाटत आता आपण इतके सेक्युलर आहोत जितके आधी होतो. सेक्युलर असणं आणि ती भावना असणं खूप गरजेचं आहे. आता आपण गोष्टी विचारपूर्वक करत नाही. आता आपण प्रोपगंडा सिनेमे बनवत आहोत का? माहित नाही. आपण प्रभाव पाडणारे सिनेमे बनवत आहोत. जर कोणी म्हणालं की काश्मीर फाईल्स किंवा अजून कोणता असा सिनेमा प्रोपगंडा आहे...तर एका सामान्य व्यक्ती म्हणून मी म्हणेन की तो इफेक्टिव्ह सिनेमा आहे."
तो पुढे म्हणाला, "गोष्ट हिट होते. मी इथे सिनेमा प्रोपगंडा आहे की नाही याचं परीक्षण करणार नाही. मी सिनेमा बघणारा प्रेक्षक आहे. हा सिनेमा पाहून माझ्या भावना जागृत होत आहेत का? माझ्यावर याचा प्रभाव पडतोय का? तर याचं उत्तर आहे हो. मी याचं श्रेय दिग्दर्शकाला देईन. इतकी साधी ही गोष्ट आहे."
'छावा' सिनेमाबाबतीत
"जॉनने छावा सिनेमाचं कौतुक केलं आहे. तो म्हणाला, "मी विकीला मेसेजही केला होता. मी त्याच्यासाठी खूप खूश आहे. सिनेमा मस्त चालत आहे आणि प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्यात यशस्वी ठरला आहे."