जॉन अब्राहमचा ‘रोमियो, अकबर, वॉल्टर’ हा चित्रपट आजच प्रदर्शित झाला. याच चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये जॉन जे काही बोलला, ते वाचून तुम्हालाही नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. होय, मला आजपर्यंत ‘हिरो’ मिळालेत. पण आता मी ‘हिरोईन’सोबत काम करण्यास आतूर आहे, असे जॉन यावेळी म्हणाला.२०१५ मध्ये मी ‘गरम मसाला’ हा चित्रपट केला होता. म्हणायला या चित्रपटात तीन हिरोईन होत्या. पण तरीही लोकांना माझी अन् अक्षय कुमारची केमिस्ट्री अधिक आवडली. अभिषेकसोबत मी ‘दोस्ताना’ केला. हा चित्रपट गे संबंधांवर आधारीत असल्याने प्रश्नच नव्हता. यानंतर आलेल्या ‘ढिशूम’ या चित्रपटातही माझी अन् वरूण धवनची केमिस्ट्रीच चर्चेचा विषय ठरली. आता मात्र माझ्या अपोझिट एखादी हिरोईन असावी, असे मला वाटतेय. हिरोईनसोबत काम करण्यास मी उतावीळ आहे, असे जॉन म्हणाला.
जॉन म्हणतो, निश्चितपणे त्यात तथ्य आहे. कारण जॉनच्या वाट्याला आजपर्यंत ज्या काही लव्हस्टोरीज आल्यात, त्यात त्याची हिरोसोबतची ट्यूनिंगच लोकांना अधिक भावली. त्यामुळे हिरोईनसोबत एक तरी चित्रपट मिळावा, ही जॉनची इच्छा निश्चितच दुर्लक्षित करण्यासारखी नाही.
जॉनच्या ‘रोमियो, अकबर, वॉल्टर’ या चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा चित्रपट १९७१ च्या युद्धातील एका सत्य घटनेवर आधारित आहे. जॉन अब्राहम यात १८-२० वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. मौनी रॉय आणि जॅकी श्रॉफ यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.रॉबी गरेवाल यांनी ‘रोमिओ, अकबर, वॉल्टर (रॉ)’ या चित्रपटाची पटकथा लिहिली असून तेच या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.