Join us

जॉन अब्राहमला या गोष्टीपासून जायचे आहे दूर, वाचून फॅन्सना बसेल आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 10:49 AM

जॉन अब्राहम आता एका गोष्टीला कंटाळला असून त्या गोष्टीपासून त्याला दूर जायचे आहे अशी कबुली त्याने नुकत्याच एका मुलाखतीत दिली आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियावर कोणतीही पॉझिटिव्ह गोष्ट कोणीही बोलत नाहीये. या सगळ्या गोष्टींमुळे मी हळूहळू सोशल मीडियापासून दूर जायचे ठरवले आहे. मीच नव्हे तर अनेक सेलिब्रेटी येत्या काळात सोशल मीडियापासून भविष्यात दूर जातील असे मला वाटते.

जॉन अब्राहमचाबाटला हाऊस हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सध्या जॉन करत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत सोशल मीडियाविषयी त्याचे काय मत आहे याविषयी त्याने सांगितले आहे.

नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सोशल मीडियावर कलाकारांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते यावर जॉनने भाष्य केले आहे. तो सांगतो, सोशल मीडियावर आता सगळेच लोक अ‍ॅक्टिव्ह झाले असून ते जगात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर आपले मत व्यक्त करताना दिसत आहेत. अनेकांना तर ते ज्या विषयावर मत व्यक्त करत आहे, ते खरे प्रकरण काय आहे हे देखील माहीत नसते. सोशल मीडियावर उगाचच काहीही पोस्ट करणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे.

तुम्ही सोशल मीडियावरील संदेश अर्धा तास जरी वाचले तरी तुम्ही आजारी पडाल असे मला वाटते. कारण तिथे धर्म, जाती यांच्याविषयी अतिशय वाईट गोष्टी बोलल्या जात आहेत. तिथे कोणतीही पॉझिटिव्ह गोष्ट कोणीही बोलत नाहीये. या सगळ्या गोष्टींमुळे मी हळूहळू सोशल मीडियापासून दूर जायचे ठरवले आहे. मीच नव्हे तर अनेक सेलिब्रेटी येत्या काळात सोशल मीडियापासून भविष्यात दूर जातील असे मला वाटते. मी सध्या देखील सोशल मीडियावर खूपच कमी अ‍ॅक्टिव्ह असतो. 

बाटला हाऊस 15 ऑगस्टला प्रदर्शित होत असून बाटला हाऊस हा एक सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. १९ सप्टेंबर २००८ रोजी सकाळी ११ वाजता दक्षिण दिल्लीतील जामिया नगरातील एल-१८ बाटला हाऊस येथे दिल्ली पोलिसांचे विशेष दल आणि इंडियन मुजाहिदीनचे चार अतिरेकी यांच्यात चकमक झाली होती. दोन तासांच्या धुमश्चक्रीत आतिफ अमिन आणि महम्मद साजिद ठार झाले तर विशेष दलाचे निरीक्षक मोहन चंद शर्मा शहीद झाले. याच घटनेवर आधारित हा चित्रपट असून यात जॉन पोलीस अधिकारी संजय कुमार यादव यांची भूमिका साकारणार आहे. या चकमकीत संजय कुमार यादव यांनी पोलीस पथकाचं नेतृत्त्व केलं होतं. १९ सप्टेंबरच्या रात्री असं नेमकं काय घडलं होतं हे या चित्रपटातून समोर येणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल अधिक कुतूहल आहे. 

टॅग्स :जॉन अब्राहमबाटला हाऊस