Join us

John Abraham : जॉन आणि पठाणचं बिनसलं ? शाहरुखच्या प्रश्नाकडे जॉनने केलं दुर्लक्ष; बॉलिवूडमध्ये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 10:10 AM

आतापर्यंत दोन अभिनेत्रींचं एकमेकींशी पटत नाही हे आपण ऐकलंच आहे पण दोन अभिनेत्यांचं सुद्धा बिनसतं असं आपण क्वचितच ऐकतो.

John Abraham : यशराज फिल्म्सच्या आगामी पठाण (Pathaan) सिनेमात जॉन अब्राहम खलनायकाची भूमिका साकारत आहे. शाहरुख खान (Shahrukh Khan) सोबतच चाहत्यांना जॉन अब्राहमला बघायचीही उत्सुकता लागली आहे. मात्र आता एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. आतापर्यंत दोन अभिनेत्रींचं एकमेकींशी पटत नाही हे आपण ऐकलंच आहे पण दोन अभिनेत्यांचं सुद्धा बिनसतं असं आपण क्वचितच ऐकतो. आता जॉन आणि शाहरुखचं एकमेकांशी पटत नाही अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे. 

जॉन अब्राहम नुकताच हेल्थकेअर ब्रॅंडच्या इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याला शाहरुखबाबत प्रश्न विचारण्यात आला. मात्र यावर उत्तर टाळत त्याने पुढचा प्रश्न असा म्हणाला. यावरुनच आता शाहरुख आणि जॉनमध्ये बिनसल्याची चर्चा सुरु झाली.

जॉनने शेअर केली पोस्ट 

जॉन अब्राहमने इन्स्टाग्रामवर एक पोस्टही शेअर केली आहे. ज्यात त्याने पठाणसाठी आभार मानले आहेत. त्याने लिहिले, 'माझ्या फिल्मी करिअर मध्ये सध्याचा क्षण हा खूप खास आहे. तुम्ही पठाणच्या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद दिला. या चित्रपटासाठी सर्वांनीच खूप मेहनत घेतली आहे. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आदित्यने नेहमीच मला बेस्ट भूमिका दिल्या आहेत. तसंच सिद्धार्थ आनंदने या सिनेमासोबत आणि माझ्यासोबत नक्की काय जादू केली आहे हे तुम्ही बघावं याची मला उत्सुकता आहे. पठाणबद्दल मला अजून बरंच बोलावंसं वाटतंय पण आपण सगळेच आता २५ जानेवारी पर्यंतची वाट बघू. सर्वात मोठया मनोरंजनासाठी तयार राहा.ट्रेलरला प्रतिसाद दिल्याबद्दल खूप आभार.'

शाहरुखचा 'पठाण' २५ जानेवारी रोजी रिलीज होत आहे. पठाणच्या रिलीजला उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला आहे. आत्तापर्यंत ३० मिलियन व्ह्यूज ट्रेलरला मिळाले आहेत. तर पठाण मधील बेशरम रंग हे गाणंही सध्याचं ट्रेंडिंग आणि लोकप्रिय गाणं आहे.

टॅग्स :पठाण सिनेमाजॉन अब्राहमशाहरुख खान