Depp Vs Heard Trailer: गेल्या वर्षी हॉलिवूड अॅक्टर जॉनी डेप आणि अॅम्बर हर्ड यांचे मानहानी प्रकरण जगभर चर्चेत आले होते. आता त्या प्रकरणावर तीन भागांची डॉक्यु सिरीज बनवण्यात आली आहे. सिरीजचा ट्रेलरदेखील रिलीज झालाय. ही सीरीज 16 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित केली जाईल. जॉनी डेप आणि अॅबर हर्डची अनेक गुपिते या मालिकेतून उघड होणार आहेत.
2022 मध्ये जॉनी डेप आणि अॅम्बर हर्ड यांचा मानहानीचा खटला खूप गाजला होता. कोर्टाच्या सुनावणीदरम्यान जॉनी आणि अॅम्बरने एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्या खटल्याचा निर्णय जॉनी डेपच्या बाजूने आला. सुरुवातीपासून सर्वांना वाटत होते की, जॉनीनेच अॅम्बरवर अत्याचार केला आहे. पण, सुनावणीदरम्यान अनेक पुरावे समोर आले, ज्यातून स्वतः जॉनी पीडित असल्याचे सिद्ध झाले. त्या प्रकरणावर आता एक डॉक्युमेंट-सिरीज बनवण्यात आली आहे, ज्याचा ट्रेलर आला आहे. या डॉक्यु सिरीजचे नाव 'डेप व्हर्सेस हर्ड' आहे.
Depp Vs Heard चा ट्रेलर पहा:
जॉनी आणि अॅम्बरचे आरोपजॉनी डेपने 2018 च्या 'द वॉशिंग्टन पोस्ट'मध्ये बदनामी केल्याबद्दल अॅम्बर हर्डविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यानंतर अॅम्बरने डेपवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले. अॅम्बरने वॉशिंग्टन पोस्टमधील एका लेखात जॉनीवर नाव न घेता लैंगिक आणि घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून जॉनीने तिच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. या लेखामुळे आपली प्रतिमा डागाळली असल्याचा दावा डेपने केला होता. त्या लेखानंतर जॉनीची जगभरात खूप बदनामी झाली होती. जॉनीच्या हातून अनेक चित्रपटही निघून गेल्यामुळे त्याच्या करिअरवरही मोठा परिणाम पडला. अखेर त्या खटल्यात जॉनीच्या बाजुने निकाल आला होता.