Join us

​‘जॉली एलएलबी २’ : अक्षय कुमारसह सहा जणांना कायदेशीर नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2016 9:47 PM

बॉलिवूडचा खिलाडी कुमारच्या आगामी चित्रपटांच्या यादीत आघाडीवर असलेल्या जॉली ‘एलएलबी २’ या चित्रपटातील आक्षेपार्ह संवादासाठी एका कंपनीने अब्रुनुकसानीचा आरोप ...

बॉलिवूडचा खिलाडी कुमारच्या आगामी चित्रपटांच्या यादीत आघाडीवर असलेल्या जॉली ‘एलएलबी २’ या चित्रपटातील आक्षेपार्ह संवादासाठी एका कंपनीने अब्रुनुकसानीचा आरोप करीत कायदेशीर नोटीस पाठविला आहे. ‘जॉली एलएलबी २’ चा ट्रेलरमध्ये असलेल्या एका संवाद या कायदेशीर कारवाहीसाठी कारणीभूत ठरला आहे. फुटवेअर मॅन्यूफॅक्चरर कंपनी ‘बाटा’ या कं पनीने केलेल्या आरोपानुसार ‘जॉली एलएलबी २’च्या ट्रेलरमध्ये ‘बाटा’शी निगडीत आक्षेपार्ह संवाद आहे. या संवादात बाटाच्या चपलांना निकृष्ठ दर्जाचे उत्पादन असे संबोधून कंपनीची थट्टा करण्यात आली आहे. यामुळे आमच्या ब्रँडची प्रतिमा मलीन झाली असल्याचा आरोप कंपनीने केला आहे. यासोबत बाटा या कं पनीला आर्थिक नुकसान पोहचविण्याचा आरोपही लावण्यात आला आहे. ‘जॉली एलएलबी २’चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला असून याला अक्षयच्या चाहत्यांकडून चांगलीच प्रशंसा मिळत आहे. या ट्रेलरमध्ये श्रीमंत वकिलाची भूमिका साकारणारे अन्नू कपूर अक्षय कुमारला उद्देशून ‘बाटा का जूता और टुच्चीसी टेरिकॉट की शर्ट पहनकर हमसे जुबान लढा रहे है’. ट्रेलरमधील हे दृश्य बाटाच्या जिव्हारी लागले आहे. यामागे आणखी एक कारण असून अक्षय कुमार एका फुटवेअर बँ्रडचे एन्डॉर्समेंट करीत आहे. बाटाने यात प्रतिस्पर्धी कंपनीचा हात असावा अशी शंका व्यक्त केली आहे.  बाटाने अभिनेता अक्षय कुमार व अन्नू कपूर, दिग्दर्शक सुभाष कपूर, कार्यकारी निर्माता नरेन कुमार, डायरेक्टर चिफ दीपक जैकब, आणि अमित शहा यांना नोटीस पाठविली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांनी याबद्दल माहिती देताना म्हणाले, याबद्दल निर्माते खुलास करतील कारण या प्रकरणावर बोलण्याचा अधिकार दिग्दर्शकाला नाही. या आहेत बाटाच्या मागण्या : ट्रेलर व चित्रपटातून हे दृश्य काढून टाकण्यात यावे. कंपनीची बदनामी केल्याबद्दल लिखित दिलगीरी व्यक्त करावी व भविष्यात बदनामी न करण्याची लेखी हमी द्यावीबाटा या ब्रँडचे नाव चुकून घेण्यात आले असा नोटीस ट्रेलर व चित्रपटामध्ये दाखवावा.