Join us

अनुपम खेर यांचा आजवरचा सिनेसृष्टीतील प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 9:59 AM

अभिनेते दिग्दर्शक अनुपम खेर यांची FTII च्या म्हणजेच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गजेंद्र चौहान यांची ...

अभिनेते दिग्दर्शक अनुपम खेर यांची FTII च्या म्हणजेच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गजेंद्र चौहान यांची जागी अनुपम खेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गजेंद्र हे  2015 सालीपासून FTIIच्या अध्यक्षपदी होते. केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाने ही नियुक्ती केली आहे.सध्या अनुपम खेर त्यांचा आगामी चित्रपट 'रांची डायरीज'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अनुपम खेर यांची निवड झाल्यामुळे बॉलिवूडमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनुपम खेर यांचा जन्म 7 मार्च 1955साली शिमलामध्ये कश्मीरी पंडितांच्या घरात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिमलामध्येच झाले त्यांनतर त्यांनी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून (एनएसडी) त्यांनी बॅचलर डीग्री पूर्ण केली. सुरुवातीपासूनच त्यांचा कल रंगभूमीकडे होता. अभिनयातील वेडापायी त्यांनी मुंबई गाठली. मात्र मुंबईत आल्यावर अभिनेयात करिअर करण्याची वाट तेवढी सोपी नव्हती त्यासाठी त्यांना बऱ्याच संघर्ष करावा लागला. 1982 साली मध्ये आलेल्या आगमन या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले  मात्र हा चित्रपट फारसा चालला नाही. यानंतर महेश भट्ट यांच्या सारांश या चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. सारांशमध्ये त्यांनी 65 वर्षांच्या वृद्धाची भूमिका अगदी सहजतेने साकारली ज्यावेळी त्यांचे वय फक्त 28वर्षे होते. याचित्रपटासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 1986 साली सुभाष घई यांच्या आलेल्या कर्मा या चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका साकारण्याचा संधी मिळाली आणि या संधीचे त्यांनी सोने केले. याचित्रपटात त्यांच्यासोबत दिलीप कुमार ही होते मात्र प्रेक्षकांना लक्षात राहिले ते अनुपम खेर. त्यांना कर्मा आणि डॅडीमधील त्यांच्या अभिनयासाठी सर्वेकृष्ठ अभिनेत्याचे फिल्म फेअर अॅवॉर्ड पटकावले.  राम लखन, दिल, बेटा, डीडीएलजे,  हम आपके हैं कौन, कुछ-कुछ होता है, मोहब्बतें, 1942 ए लव्ह स्टोरी, वीर जारा, मैने गांधी को नहीं मारा हे त्यांचे सुपरहिट चित्रपट. ओम जय जगदीश या चित्रपटव्दारे त्यांनी दिग्दर्शन आणि निमिर्ती क्षेत्रात पदार्पण केले. मैंने गांधी को नही मारा या चित्रपटाची निर्मिती ही त्यांनीच केली होती. याचित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले.ALSO RAED :  अनुपम खेर असतील एफटीआयआयचे नवे अध्यक्ष