आज साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचा वाढदिवस आहे. 1983 मध्ये हैदराबादमध्ये जन्मलेले ज्युनियर एनटीआर हा लोकप्रिय अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असलेले एनटी रामराव यांचा नातू आहे. ज्युनियर एनटीआरने 2001 मध्ये 'स्टुडंट नंबर 1'पासून आपल्या करिअरची सुरुवात केली. तो अनेक उत्तम चित्रपटांमध्ये दिसला आहे. लवकरच तो एस.एस. राजामौलीच्या बहुप्रतिक्षित चित्रपट आरआरआरमध्ये दिसणार आहे. यात आलिया भट्ट देखील मुख्य भूमिकेत आहे.
एनटीआरने त्याच्या चित्रपटांमध्ये केलेल्या उत्कृष्ट अभिनयासाठी नंदी पुरस्कार, आयफा पुरस्कार, फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट तेलगू अॅवॉर्ड जिंकला आहे. तो लक्झरीस्टाईलसाठी देखील ओळखला जातो. त्याचा कार नंबरही नेहमीच चर्चेचा विषय असतो.
ज्युनियर एनटीआर 9999 क्रमांकास लकी मानते. त्याच्याकडे एकाच नंबरच्या बर्याच गाड्या आहेत. ज्युनियर एनटीआरने आपल्या कार बीएमडब्ल्यूच्या नोंदणीसाठी फॅन्सी नंबर 9999 वर 11 लाखांची बोली लावली होती. त्याबद्दल तो खूप चर्चेत देखील आला होता.
हैदराबादमधील ज्युबिली हिल्समधील लक्झरी घरात ज्युनियर एनटीआर कुटुंबासमवेत राहतो. या घराची किंमत सुमारे 25 कोटी आहे. राम चरण आणि चिरंजीवी ज्युनियर हे एनटीआरचे शेजारी आहेत. याशिवाय बंगळुरु आणि कर्नाटकमध्येही त्यांच्याकडे अनेक लक्झरी घरे आहेत.
बिग बॉसच्या साऊथ व्हर्जनसाठी त्याला 25 कोटी रुपये मिळाले यावरून ज्युनियर एनटीआरच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो ज्युनिअर एनटीआरने 'स्टुडंट नंबर 1', सिंहद्री, बादशाह, टेम्पर, जनता गर्जे आणि जय लवकुश सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे.