Join us

अबब..! War 2'साठी RRR फेम ज्युनिअर एनटीआरनं घेतलं इतकं मानधन, आकडा पाहून हृतिकला लागेल झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 1:28 PM

ह्रतिक रोशनच्या 'वॉर 2'मध्ये ज्युनियर NTR दिसणार आहे, यासाठी त्याने मोठी फीस घेतली आहे.

नुकतेच साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआरबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर सुपरस्टार ज्युनियर एनटीआरची हृतिक रोशन स्टारर फिल्म वॉर 2 मध्ये ग्रँड एंट्री झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्युनियर एनटीआर हृतिक रोशनच्या वॉर 2 मध्ये भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की त्याचे पात्र नकारात्मक असेल आणि चित्रपटात हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळेल. या सगळ्या बातम्यांदरम्यान आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे.

ज्युनियर एनटीआर चार्ज करणार 100 कोटी रिपोर्टनुसार, RRR स्टारने आदित्य चोप्राच्या यशराज फिल्म्स बॅनरखाली बनत असलेल्या हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर स्टारर फिल्म वॉर 2 साठी मोठी रक्कम आकारली आहे. होय, बातम्यांनुसार, ज्युनियर एनटीआरने वॉर 2 ची फी वाढवली आहे. या चित्रपटासाठी तो 100 कोटी रुपये घेणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे हृतिक रोशन देखील या चित्रपटासाठी100 कोटी रुपये घेणार असल्याचं बोललं जातंय.  यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा हा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये बनवला जाणार आहे.

शूटिंगमध्ये बिझी ज्युनियर NTRRRR स्टार ज्युनियर NTR  'वॉर 2' व्यतिरिक्त दोन मोठ्या चित्रपटांचा एक भाग आहे. ज्युनियर एनटीआर सध्या दिग्दर्शक कोरटाला सिवा यांच्या आगामी चित्रपट एनटीआर ३० च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे.या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाशिवाय ज्युनियर एनटीआरने KGF 2 चे दिग्दर्शक प्रशांत नील यांचा पुढील चित्रपटही साइन केला आहे. या चित्रपटाला सध्या 'NTR 31' म्हटलं जात आहे.

टॅग्स :ज्युनिअर एनटीआरहृतिक रोशन