Join us

साऊथ कलाकारांची वाढती क्रेझ! हृतिक रोशनच्या 'वॉर 2' मध्ये 'या' साऊथ सुपरस्टारची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 16:23 IST

अभिनेता हृतिक रोशनच्या आगामी 'वॉर 2' सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. '

अभिनेता हृतिक रोशनच्या आगामी 'वॉर 2' (War 2) सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'वॉर'(War) सिनेमात हृतिकचे एक्शन सीक्वेन्स पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. आता वॉर 2 मध्ये साऊथ सुपरस्टारचीही एंट्री झाली आहे. होय. सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर (JrNTR)  'वॉर 2' मध्ये भूमिका साकारणार आहे. त्यामुळे पुढच्या भागात हृतिक, टायगर श्रॉफ सोबतच ज्युनिअर एनटीआरही सामील होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून साऊथचे चित्रपट आणि कलाकार जागतिक स्तरावर टक्कर देत आहेत. त्यांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता बॉलिवूडमध्येही त्यांची दखल घेतली गेली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करत 'वॉर 2' मध्ये ज्युनिअर एनटीआरची एंट्री अशी माहिती दिली.

नुकतेच शाहीद कपूरच्या 'फर्जी' या लोकप्रिय सीरिजमध्ये साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीने भूमिका साकारली. तर शाहरुखच्या 'जवान' सिनेमातही विजय सेतुपतीची एंट्री झाली आहे. आता ज्युनिएर एनटीआर 'वॉर 2' मध्ये कोणत्या भूमिकेत दिसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 

'वॉर २' बाबत आणखी महत्वाचा बदल म्हणजे सिनेमाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी (Ayan Mukherjee) करणार आहे. होय, 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या यशानंतर अयानकडे 'वॉर 2' ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सिद्धार्थ आनंद यांच्याजागी आता अयानवर दिग्दर्शनाची धुरा सोपवण्यात आली आहे.  

टॅग्स :हृतिक रोशनज्युनिअर एनटीआरवॉर