Join us  

ज्युबिलीस्टार राजेंद्रकुमार प्रेमात पडतात तेंव्हा....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2017 12:11 PM

ज्युबिलीस्टार म्हणून राजेंद्रकुमार यांची ओळख. १९६० च्या दशकात त्यांचे अनेक चित्रपट गाजले. त्यांचे आयुष्य साधे, सरळ असले तरी त्यांच्या ...

ज्युबिलीस्टार म्हणून राजेंद्रकुमार यांची ओळख. १९६० च्या दशकात त्यांचे अनेक चित्रपट गाजले. त्यांचे आयुष्य साधे, सरळ असले तरी त्यांच्या आयुष्यात काही काळासाठी सायरा बानो आली होती. हे दोघे काही वर्षे डेटींग करीत होते. राजेंद्रकुमार यांच्या आयुष्याबाबत...राजेंद्रकुमार यांचे कुटुंब पंजाबमधील. त्यांचे आजोबा ब्रिटीशकालिन सैन्यात कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांचा कराची, सिंध प्रांतात कापड उद्योग होता. फाळणीनंतर ते मुंबईत आले. त्यावेळी राजेंद्रकुमार यांनी आपले नशीब हिंदी चित्रपटसृष्टीत आजमायचे ठरविले. त्यांना हिरो व्हायचे नव्हते. एच. एस. रवैल यांच्यासोबत त्यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले.  पाच वर्षे त्यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले.१९५० साली त्यांनी दिलीप कुमार आणि नर्गिस यांनी यांच्यासोबत काम केले. देवेंद्रकुमार गोयल यांनी १९५५ साली त्यांना ब्रेक दिला. मदर इंडियामध्ये त्यांनी नर्गिस यांच्या मुलाची भूमिका केली. गुंज उठी शहनाई हा त्यांचा पहिला मोठा चित्रपट. धुल का फुल (१९५९), दिल एक मंदिर (१९६३), मेरे मेहबूब (१९६३), संगम (१९६४), आरजू (१९६५), सूरज (१९६६), तलाश आणि गंवार (१९७०) या चित्रपटात यश मिळविले. १९५० च्या दशकात त्यांनी आपल्या कारकीर्दीस सुरूवात केली. त्यांचे मुळ नाव राजेंद्रकुमार टुली असे होते. त्यांनी एकूण कारकीर्दीत ८० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. सुमारे चार दशके ते काम करीत होते. साठाव्या दशकातील ते यशस्वी बॉलिवूड अभिनेते होते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्याशिवाय त्यांनी आपला मुलगा कुमार गौरवसाठीही चित्रपट केले. राजेंद्रकुमार यांनी शुक्ला यांच्याशी लग्न केले होते. त्यांना तीन मुले आहेत. मनोज याचे नाव कुमार गौरव असे ठेवण्यात आले. त्याशिवाय त्यांना दोन मुलीही आहेत. त्यांच्या लग्नाविषयी फारशी काही माहिती उपलब्ध नाही. शुक्ला यांनी शेवटपर्यंत त्यांच्याशी साथ निभावली. लग्नानंतर राजेंद्रकुमार यांचे अनेक चित्रपट यशस्वी झाले. लग्नापूर्वीपासून राजेंद्रकुमार आणि शुक्ला यांच्यात प्रेमसंबंध होते. पुढे याचे लग्नात रूपांतर झाले.राजेंद्रकुमार यांचे नाव सायरा बानो यांच्याशी जोडले गेले. सायरा आणि राजेंद्रकुमार यांनी साठाव्या दशकात आई मिलन की बेला (१९६४), झुक गया आसमान (१९६८), अमन (१९६७) हे चित्रपट केले. हे सर्व चित्रपट गाजले. त्याकाळी या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याच्या अफवा येत होत्या. राजेंद्रकुमार यांचे लग्न झाले होते. आता हे दोघे लग्न करणार अशा अफवा उठल्या असतानाच सायरांच्या आई नसीम बानू यांनी यात उडी घेतली. लग्न झालेल्या व्यक्तीसोबत विवाह करायचा नाही, असे सांगत सायराना दूर केले.