Join us

जुही चावलाने आपल्या १६ वर्षीय मुलीला पार्ट्यांपासून दूर राहण्याचा दिला सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2018 4:26 PM

प्रेमप्रधान चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री जुही चावला हिचा इंडस्ट्रीतील प्रभाव आजही कायम आहे. त्यामुळेच जुही ...

प्रेमप्रधान चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री जुही चावला हिचा इंडस्ट्रीतील प्रभाव आजही कायम आहे. त्यामुळेच जुही अधून-मधून कुठल्या ना कुठल्या चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाची झलक तिच्या चाहत्यांना दाखवित असते. जुही ज्यापद्धतीने चित्रपटात आपल्या अभिनयाला न्याय देते, तेवढ्याच चोख पद्धतीने ती रिअल लाइफमध्येही आपल्या जबाबदाºया पार पाडत आली आहे. त्यामुळेच तिला एक परफेक्ट मदर म्हणून ओळखले जाते. लवकरच जुही ‘शरणम्’ या टीव्ही मालिकेत बघावयास मिळणार असून, यानिमित्त तिने एका वेबसाइटला मुलाखत दिली असता, आईची भूमिका समजावून सांगितली. जुहीने तिच्या १६ वर्षीय मुलगी जान्हवीविषयी सांगितले की, माझी मुलं शिक्षण घेत आहेत. मोठी मुलगी अभ्यासात हुशार आहे. मला असे वाटते की, ती लेखिका बनणार. शाळेत ती नेहमीच टॉप राहिली आहे. तिला इतिहास या विषयात विशेष रूची आहे. ती चित्रपटांमध्ये काम करणार काय? असा जर कोणाला प्रश्न पडत असेल तर मला असे वाटते की, बॉलिवूडमध्ये सुरुवातीच्या तुलनेत बराच बदल झाला आहे. अशातही ती जर अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छित असेल तर मला सर्वाधिक आनंद होईल. मात्र अशात मी तिला एक सल्ला देऊ इच्छिणार. होय, तिने वायफळ गोेष्टी, गॉसिप आणि पार्ट्यांपासून दूर राहत आपल्या कामावर फोकस करावा, अशी माझी इच्छा असेल. यावेळी जुहीला तिच्यामध्ये असलेल्या सकारात्मकेविषयी विचारण्यात आले. जुहीने सांगितले की, एक वेळ अशी आली होती, जेव्हा मला वाटले की, आता मी पूर्णत: संपली. जेव्हा माझे करिअर भरारी घेत होते, तेव्हा माझ्या आईचा अपघात झाला. एका क्षणात ती व्यक्ती माझ्यापासून दूर निघून गेली, जिच्यावर मी सर्वाधिक प्रेम करीत होते. काही काळानंतर वडील अन् त्यानंतर आईसारख्या माझ्या मावशीचे कॅन्सरने निधन झाले. भावाला ब्रेन हॅमरेज झाला होता, तो कोमामध्ये गेला होता. या चार वर्षांत मी जे काही दिवस बघितले ते एखाद्या वाईट स्वप्नासारखे होते, असेही जुहीने सांगितले.