Join us

जुही चावला सांगतेय, माझ्या आयुष्यात अडचणी आल्यानंतर मी हे करते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 20:00 IST

१९८४ साली मिस इंडिया हा किताब जिंकल्यानंतर, तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने तिच्या विनोदी टायमिंगने आणि वैविध्यपूर्ण ऑनस्क्रीन व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांना थक्क करून टाकले.

ठळक मुद्देजुही चावला सांगते, ''अनेकदा मी खूप मेहनत घेऊनही काम चांगले झाले नाही. तरीही, माझ्या मार्गात जे काही आले ते मी सकारात्मकतेने घेतले आणि मला माझा योग्य मार्ग मिळत गेला. मला हे समजेपर्यंत, माझे करिअर सेट झाले होते.''

जुही चावलाने 'कयामत से कयामत तक', 'लुटेरे', 'डर' आदी बॉलीवूड चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. १९८४ साली मिस इंडिया हा किताब जिंकल्यानंतर, तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने तिच्या विनोदी टायमिंगने आणि वैविध्यपूर्ण ऑनस्क्रीन व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांना थक्क करून टाकले. सध्या एमएक्स प्लेअरवर जुही चावला आपल्या अभिनय कारकिर्दीबद्दल गप्पा मारण्यासाठी सज्ज झाली आहे. कवयित्री, व्यावसायिक आणि गायिका अनन्या बिर्ला यांच्या '११ मंत्रास ऑफ बिईंग अनस्टॉपेबल वुईथ अनन्या' या त्यांच्या शोमध्ये जुही चावला झळकणार आहे.

आज अनेक महिलांसाठी आणि उदयोन्मुख अभिनेत्रींसाठी प्रेरणास्थान बनलेली जुही या शोमधून तिच्या आयुष्यातील अनुभव आणि लाईफ मंत्र सांगणार आहे. एमएक्स प्लेअरच्या '११ मंत्रास ऑफ बिईंग अनस्टॉपेबल वुईथ अनन्या' या शोबद्दल बोलताना जुही चावला सांगते, ''अनेकदा मी खूप मेहनत घेऊनही काम चांगले झाले नाही. तरीही, माझ्या मार्गात जे काही आले ते मी सकारात्मकतेने घेतले आणि मला माझा योग्य मार्ग मिळत गेला. मला हे समजेपर्यंत, माझे करिअर सेट झाले होते.''

अनन्या बिर्ला यांच्या अनस्टॉपेबल या म्युझिक व्हिडिओसह चित्रीत करण्यात आलेल्या या नव्या शोमधून विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांच्या यशोगाथा प्रेक्षकांसमोर आणण्यात येणार आहेत. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या काही यशस्वी महिलांमध्ये मेरी कोम, सानिया मिर्झा, जुही चावला, अपर्णा पोपट, फाल्गुनी पिकॉक, कनिका कपूर, अनुष्का दांडेकर, मालिनी अग्रवाल यांचा समावेश आहे. तर, पूजा हेगडे, सुकृती कक्कर आणि निरजा बिर्ला यांचाही खास सहभाग या शोमध्ये असणार आहे.

जुही चावलाला नव्वदीच्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानले जात असे. तिने तिच्या कारकिर्दीत खूप चांगल्या भूमिका साकारल्या असून या भूमिकांसाठी तिला पुरस्कार देखील मिळाले आहेत. जुही आज तिच्या कुटुंबाला जास्त वेळ देत असल्याने खूपच कमी चित्रपटांमध्ये काम करताना दिसते. ती आयपीएलच्या कोलकाता टीमची मालकीण देखील आहे. 

टॅग्स :जुही चावला