Join us

OMG!! ‘या’ कारणामुळे जुही चावलाने लपवली होती लग्नाची गोष्ट, 25 वर्षांनंतर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 08:00 IST

काय म्हणाली जुही...?

ठळक मुद्दे1995 साली जुहीने बिझनेसमॅन जय मेहतासोबत लग्न केले.

आपल्या खट्याळ हास्याने आणि अभिनयाने एकेकाळी प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री जुही चावला सध्या बॉलिवूडपासून दूर आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतेय. ‘सल्तनत’ हा जुहीचा पहिला सिनेमा. पण हा पहिलाच सिनेमा सुपरफ्लॉप झाला. पण यानंतर आलेल्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाने मात्र कमाल केली आणि जुही एका रात्रीत स्टार झाली. या चित्रपटानंतर तिने एकापाठोपाठ एक असे अनेक हिट सिनेमे दिलेत. मात्र करिअरच्या शिखरावर असताना जुहीने अचानक लग्न केले. अर्थातअनेक वर्षे जुहीच्या लग्नाची भणकही कुणाला लागली नाही. तिने अगदी पद्धतशीरपणे हे लग्न जगापासून लपवून ठेवले. का?  तर त्याचा खुलासा इतक्या वर्षांनंतर झालाय.

होय, एका ताज्या मुलाखतीत जुहीने लग्न लपवण्यामागच्या कारणांचा खुलासा केला. ती म्हणाली, ‘त्यावेळी इंटरनेट नव्हते. प्रत्येक फोनमध्ये कॅमेराही नव्हता. त्यामुळे माझे लग्न झालेय, हे लपवणे सहज शक्य झाले. लग्न झाले त्यादरम्यान मी यशाच्या शिखरावर होते. मला लग्नानंतरही काम करायचे होते. लग्नाचा खुलासा केला तर करिअर संपेल, अशी भीती मला होती. त्यामुळे मी शांत बसले आणि काम करत राहिले.’

1995 साली जुहीने बिझनेसमॅन जय मेहतासोबत लग्न केले. ही लव्हस्टोरी कशी सुरु झाली होती, याचाही खुलासा तिने केला. तिने सांगितले, ‘बॉलिवूड डेब्यूआधीच एकदा जयसोबत भेट झाली होती. पण ही भेट खूपच छोटी होती. चित्रपटात काम करायला लागल्यानंतर जयसोबत कुठलाही संपर्क नव्हता. पण काही वर्षांनंतर एका मित्राच्या डिनर पार्टीत आम्ही पुन्हा भेटलो आणि आमच्यात मैत्री झाली.

यानंतर मी जिथे असेल तिथे जय हजर असायचा. मी एखाद्या ठिकाणी पोहोचले की तो फुलांचा गुच्छ आणि गिफ्ट घेऊन आधीच पोहोचलेला असायचा. माझ्या एका वाढदिवसाला त्याने मला ट्रकभर गुलाबांची फुले पाठवली होती. यानंतर वर्षभराने त्याने मला प्रपोज केले होते.’

टॅग्स :जुही चावला