Join us

‘सूर जोत्स्रा’च्या ललाटावर ‘अंकित’ले स्वर! अंकित तिवारीचा धम्माल परफॉर्मन्स!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 4:43 PM

लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे दिल्या जाणा-या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत ...

लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे दिल्या जाणा-या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराची आजची रात्र  गायक अंकित तिवारीच्या सुरांनी ख-या अर्थाने सूरमयी झाली. नागपुरातील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सोहळा सुरु झाला आणि औपचारिक उद्घाटनानंतर ‘एकापेक्षा एक अशा जबरदस्त गाण्यांचा नजराणा घेऊन अंकित स्टेजवर आला. अंकित स्टेजवर येताच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला आणि पुढे तासभर अंकितच्या गाण्यांवर अख्खे स्टेडियम नुसते थिरकत राहिले, तू जो है तो मैं हू...या गाण्याने अंकितच्या लाईव्ह परफॉर्मन्सला सुरूवात झाली. थँक्स यू नागपूर...क़ैसे हो, असे अंकितने विचारले आणि नागपुरकर अंकितच्या प्रेमात पडले. यानंतर ओ फकीरा...हे गाणे अंकित घेऊन आला आणि वातावरण काहीसे गंभीर झाले. यानंतर चंदा मेरे या...या गाण्याने अंकित व त्याच्या आॅर्केस्ट्राने समा बांधला. पुढे तर नागपुरकरांनी एका सूरात अंकितला सून रहा है ना तू... या गाण्याची फर्माईश केली अन् आर यू रेडी म्हणत, अंकितने नागपुरकरांची ही फर्माईश पूर्ण केली. या गाण्याने माझे आयुष्य बदलले़,असे अंकित यावेळी म्हणाला.पल्लवी माफ कर देनासूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारसोहळ्यात अंकित एकटा नव्हता तर त्याची नववधू पल्लवी त्याच्यासोबत होती. काही दिवसांपूर्वीच अंकित पल्लवीसमोर लग्नबंधनात अडकला. लग्नानंतर अंकितचा हा पहिला लाईव्ह कॉन्सर्ट होता. शिवाय तो त्याची पत्नी पल्लवीसमोर पहिल्यांदा गात होता. त्यामुळे काही चुकले तर पल्लवी मला प्लीज माफ करशील, असे अंकित म्हणाला. त्याच्या या वाक्यासोबतचं एकीकडे प्रचंड टाळ्या पडल्या दुसरीकडे पल्लवीच्या ओळांवर हसू फुलले.