Join us

"दोन चांगली माणसं...", आमिर खान-रीना दत्ताच्या घटस्फोटावर लेकाची प्रतिक्रिया

By ऋचा वझे | Updated: February 12, 2025 14:22 IST

किरण राववरही दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "बाप-बेटे दोघंही रिजेक्ट झालो"

बॉलिवूडचा 'परफेक्शनिस्ट' आमिर खान (Aamir Khan) प्रोफेशनल आयुष्यात कितीही यशस्वी झाला तरी वैयक्तिक आयुष्यात त्याला दोन वेळा अपयश आलं. आमिरचा दोन वेळा संसार मोडला. १९८६ सालीच त्याने आपली बालमैत्रीण रीना दत्ताशी (Reena Dutta) लग्न केलं होतं. मात्र नंतर १६ वर्षांनी २००२ साली त्यांनी घटस्फोट घेतला. आमिरच्या घटस्फोटाचा त्याच्या मुलांवरही आपसूकच परिणाम झाला. याविषयी आमिरची मुलगी आयरा खान तर अनेकदा बोललीच आहे. आता मुलगा जुनैद खाननेही (Junaid Khan) यावर प्रतिक्रिया दिली.

आमिर खानचा मुलगा जुनैद ३१ वर्षांचा आहे. २०२१ मध्ये त्याचा 'महाराज' सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला. या सिनेमातून त्याने पदार्पण केलं. तर आता त्याचा 'लव्हयापा' हा दुसरा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. यानिमित्त जुनैदने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. यावेळी त्याला आईवडिलांच्या घटस्फोटाचा तुझ्यावर काय परिणाम झाला होता असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, "दोन चांगली माणसं कधीकधी सोबत असलेली चांगली नसतात. त्या दोघांनी आमच्या पालनपोषणात, आमचा सांभाळ करण्यात कुठलीच कसर सोडली नाही. ते दोघंही एकटे खुश होते म्हणून त्यांनी आम्हालाही छान वाढवलं. यासाठी मी खरोखरंच त्यांचा आभारी. कारण आम्ही कधीच त्यांना भांडताना पाहिलं नाही. मुलांना अजून काय हवं...?"बहिणीसोबतच्या नात्यावर जुनैद म्हणाला, "आयरा सुद्धा खूप शांत आहे.  आम्ही दोघंही सारखेच आहोत. मी माझ्या आयुष्यातील रिलेशनशिपसाठीही आयराचाच सल्ला घेतो."

आमिर खानने २००५ साली दिग्दर्शिका किरण रावशी लग्नगाठ बांधली होती. मात्र हाही संसार ११ वर्षांनी मोडला. तरी आमिर आजही आपल्या दोन्ही पूर्वपत्नींसोबत दिसतो. किरण रावच्या सिनेमात काम करण्याविषयी जुनैद म्हणाला, "मला त्यांच्यासोबत काम करण्याची खूप इच्छा आहे. मी 'लापता लेडीज'साठीही ऑडिशन दिली होती. मात्र रिजेक्ट झालो. नंतर मलाही पटलं की स्पर्शच त्या भूमिकेसाठी योग्य होता. मीच काय आम्ही बाप-बेटे दोघंही सिनेमासाठी रिजेक्ट झालो होतो."

जुनैद खान आगामी एका सिनेमात साई पल्लवीसोबत दिसणार आहे. या सिनेमातून साई पल्लवी हिंदी पदार्पण करणार आहे. सध्या जुनैदच्या 'लव्हयापा' सिनेमातील भूमिकेचं कौतुक होत आहे.

टॅग्स :जुनैद खानआमिर खानबॉलिवूडघटस्फोट