Join us

आमिर खानचा मुलगा हीच ओळख! यावर जुनैद म्हणाला, "मला वाटतं प्रेक्षकांसोबत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:03 IST

आमिर खानचा ३१ वर्षीय मुलगा जुनैद खानचा 'लव्हयापा' सिनेमा रिलीज झाला आहे.

आमिर खानचा (Aamir Khan) मुलगा जुनैद खान (Junaid Khan) 'लव्हयापा' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा त्याचा दुसरा सिनेमा आहे. याआधी तो 'महाराज' सिनेमात दिसला जो ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. आता लव्हयापा सिनेमात त्याची जोडी बोनी कपूरची लेक खुशी कपूरसोबत जमली आहे. हा सिनेमा तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. यानिमित्त जुनैद खानने लोकमत फिल्मी शी संवाद साधला. यावेळी त्याला आमिर खानचा मुलगा असंच लोक ओळखतात यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने काय उत्तर दिलं वाचा.

आमिर खान अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीत अधिराज्य गाजवत आहे. वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे तो घेऊन येत असतो. त्याला 'परफेक्शनिस्ट' ही ओळखही मिळाली आहे. दरम्यान आता त्याचा मुलगाही सिनेमांमध्ये नशीब आजमावत आहे. मात्र सध्या त्याला लोक आमिरचा मुलगा असंच ओळखतात. यावर त्याला काय वाटतं असं विचारलं असता तो म्हणाला, "मला वाटतं प्रेक्षकांसोबत नातं बनवायला वेळ लागतो. तो वेळ मला लागणारच. एक-दोन सिनेमातून कोणी स्टार होत नाही.आमिरलाही त्याची ओळख बनवण्यासाठी ४० वर्ष लागली. त्यासाठी मलाही सतत काम करावं लागेल. तरच हे शक्य होईल."

आमिर खानचा तुला आवडणारा सिनेमा कोणता? यावर जुनैद म्हणाला, "मला त्यांचा रंग दे बसंती खूप आवडतो. मला वाटतं प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार सिनेमा आवडत असणार. म्हणजे माझ्याहून लहान असलेल्यांना कदाचित दिल चाहता है आवडत असेल. माझ्याहून मोठे असलेल्यांना लगान आवडत असेल. असं वयोगटानुसार त्यांच्या फिल्म्सचा चाहतावर्ग असणार आहे. रंग दे बसंती माझा ऑल टाईम फेवरिट सिनेमा आहे."

३१ वर्षीय जुनैद हा आमिर आणि पहिली पत्नी रिना दत्ता यांचा मुलगा आहे. जुनैद सुरुवातीला थिएटर करत होता. नंतर त्याने सिनेमांमध्ये पाऊल ठेवलं.' महाराज' आणि आता 'लव्हयापा'मधून तो भेटीला आला आहे. यानंतर तो साई पल्लवीसोबत एका सिनेमात दिसणार आहे.

टॅग्स :जुनैद खानआमिर खानबॉलिवूड