Join us

ज्युनिअर बच्चनची होळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2016 08:45 IST

होळी हा सण असा आहे की, या सणावेळी सर्व सेलिब्रिटी देखील अत्यंत मस्त धम्माल करत असतात. 

होळी हा सण असा आहे की, या सणावेळी सर्व सेलिब्रिटी देखील अत्यंत मस्त धम्माल करत असतात. अभिषेक बच्चन दरवर्षी होळीचा हा सण आपल्या जवळच्या सर्वांसोबत साजरा करत असतो. यावर्षीही त्याने होळीचा सण ऐश्वर्या, आराध्या यांच्यासोबत साजरा केला.नुकताच ज्युनिअर बच्चन अभिषेकने ऐश आणि त्यांची मुलगी आराध्या यांचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत तिघेही जण होळीच्या रंगात रंगले असून आराध्या आणि अभिषेक ऐश्वर्याच्या मांडीवर झोपले आहेत.अभिषेक बच्चनने हा फोटो सोशल मीडियावर ‘माय गर्ल्स’ कॅप्शन देऊन शेअर केला आहे.